पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 07:56 PM2019-02-14T19:56:52+5:302019-02-14T20:00:27+5:30

आनंद तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़. 

A 6 hours investigation of Prof. Anand Teltumbde by Pune Police | पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी

पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी

Next
ठळक मुद्देमाओवादी संघटनांशी संबंधाची घेतली माहिती १४ व १९ फेब्रुवारीला पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश; त्यावर २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रा.आनंद तेलतुंबडे यांची पुणेपोलिसांनी गुरुवारी ६ तास चौकशी केली़. या प्राथमिक चौकशीत त्यांचा माओवाद्यांशी कसा संबंध आला, याविषयी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली़ त्यांची पुन्हा १९ फेब्रुवारी रोजी चौकशी होणार आहे़. 
एल्गार परिषदेत माओवाद्यांचा संबंधावरुन पोलिसांनी केलेल्या तपासात आनंद तेलतुंबडे यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत सक्षम न्यायालयात जामीनासाठी अर्ज करायला सांगून तोपर्यंत अटकेपासून सरंक्षण दिले होते़. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज १ फेब्रुवारी रोजी फेटाळला होता़. त्यानंतर दुसºया दिवशी २ फेब्रुवारीला ते केरळहून मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती़. त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यावर तेलतुंबडे यांनी आपल्याला ११ फेब्रुवारीपर्यंत सरंक्षण दिले आहे़. आपण पोलिसांना तपासात सहकार्य करायला तयार असल्याचे सांगितले होते़. त्यानंतर न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांना सोडून देण्याचा आदेश दिला होता़. याविरोधात पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़. न्यायालयाने पुणे पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन तेलतुंबडे यांना १४ व १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देऊन त्यावर २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे़. 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद तेलतुंबडे हे एल्गार परिषद गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी १० वाजता हजर झाले़. 
पोलिसांनी त्यांची बंद खोलीत चौकशी सुरु केली़. या चौकशीत माओवादी चळवळीशी आपला कसा संबंध आला़ चळवळीचा प्रभाव वाढविण्यासाठी आपण काय केले़ कशासाठी केले आणि का केले़ माओवादी संघटनांवर बंदी असताना त्यांच्याशी संपर्क कशासाठी ठेवला अशाप्रकारे प्रश्न त्यांना विचारण्यात आले़. दुपारी २ पर्यंत ही चौकशी झाली़ त्यानंतर जेवणासाठी काही वेळ चौकशी थांबविण्यात आली़ त्यानंतर ३ वाजता त्यांची पुन्हा चौकशी सुरु झाली़. .
याबाबत आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले की, आपण पोलिसांना तपासासाठी सहकार्य करीत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही़. 
तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़. 

Web Title: A 6 hours investigation of Prof. Anand Teltumbde by Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.