मुख्यमंत्र्यांच्या बंधूसाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 09:27 PM2018-03-10T21:27:51+5:302018-03-10T21:27:51+5:30

व्यवस्थापन परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम करण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिसभा सदस्यांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रसेनजित फडणवीस यांना पदवीधर गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.

6 candidates withdraw his form for chief minister's brother | मुख्यमंत्र्यांच्या बंधूसाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांची माघार

मुख्यमंत्र्यांच्या बंधूसाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांची माघार

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शनिवारी मतदान  पदवीधर सदस्यांच्या खुल्या गटातील एका जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले होते.गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री कार्यालयातून अचानक सुत्रे हलली अन सर्वपक्षीय सहाही उमेदवारांनी प्रसेनजित यांच्यासाठी माघार घेतली आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांच्यासाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे व्यवस्थापन परिषदेवर ते बिनविरोध निवडून आले आहे. अधिसभा निवडणुकीमध्ये प्रसेनजित फडणवीस यांना निसटता विजय मिळाला होता, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार फिल्डिंग लावून प्रसेनजित यांना बिनविरोध निवडून आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळामध्ये रंगली आहे.  
अर्ज माघारीनंतर व्यवस्थापन परिषदेच्या प्राचार्य खुला गट, प्राध्यापक खुला गट, व्यवस्थापन परिषद खुला गट यासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शनिवारी १७ मार्च रोजी २०१८ रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. अधिसभेचे सदस्य त्यासाठी मतदान करतील. प्राचार्य खुला गटातून मनोहर चासकर व व्हि. बी. गायकवाड, प्राध्यापक गटातून महेश अबाळे व कानू गिरमकर यांच्यात लढत होत आहे. संस्था प्रतिनिधी गटातून शामकांत देशमुख व सोमनाथ पाटील यांच्या लढत होत आहे. वरिष्ठ अधिसभा सदस्यांमध्ये नाराजी व्यवस्थापन परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम करण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिसभा सदस्यांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रसेनजित फडणवीस यांना पदवीधर गटातून उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना बिनविरोध निवडूनही आणण्यात आले आहे.  मात्र , त्यामुळे वरिष्ठ अधिसभा सदस्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. 
विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेले पदवीधर, संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्यातून व्यवस्थापन परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस होता. पदवीधर सदस्यांच्या खुल्या गटातील एका जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
प्रसेनजित यांच्यासह अनिल विखे, संतोष ढोरे, अभिषेक बोके, दादाभाऊ शिनलकर, तानाजी वाघ, बागेश्री मंठाळकर या मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या पदवीधर गटाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची बनली होती. मात्र गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री कार्यालयातून अचानक सुत्रे हलली अन सर्वपक्षीय सहाही उमेदवारांनी प्रसेनजित यांच्यासाठी माघार घेतली आहे.
यापार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेच्या निवडणूकीत त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आली. अधिसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या पॅनेलना व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद यामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन या माघारी घडवून आणण्यात आल्या.
प्रसेनजित यांच्यासह व्यवस्थापन परिषदेवर पदवीधर (एनटी गटातून) विजय सोनावणे, प्राचार्य (ओबीसी गटातून) संजय चाकणे, प्राध्यापक गटातून विलास उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

Web Title: 6 candidates withdraw his form for chief minister's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.