5 year boy went into the river while riding bicycle | सायकल खेळताना चिमुकला गेला नदीत
सायकल खेळताना चिमुकला गेला नदीत

पुणे : सायकल खेळता खेळता चिमुकला नदीत गेल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिवाजीनगर भागात घडली अाहे. विराट काची (वय 5 ) असे चिमुकलल्याचे नाव असून अग्निशामक दलाकडून चिमुकल्याचा शाेध सुरु अाहे. 


    सीअाेईपी महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या बाेट क्लब जवळील भागात ही घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. विराटच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराटचे घर नदीपात्राजवळ अाहे. बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास विराट सायकल खेळत हाेता. यावेळी येथे असणाऱ्या उतारावरुन विराटची सायकल घसरत थेट नदीत गेली. एका लहान मुलाने विराट नदीत पडल्याचे घरच्यांना कळवले. घरच्यांनी लगेच नदीपात्रात धाव घेतली. कुटुबीयांनी शाेधाशाेध केल्यानंतर त्यांना विराटची सायकल अाणि बूट अाढळले. दरम्यान अग्निशामक दलाकडून नदीपात्रात विराटचा शाेध घेण्यात येत अाहे. 


    या घटनेनंतर पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. 
 


Web Title: 5 year boy went into the river while riding bicycle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.