साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:08 PM2018-04-24T21:08:06+5:302018-04-24T21:08:06+5:30

व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.

5 and haif kg gold snatchers arrested from West Bengal | साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक

साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक

Next
ठळक मुद्देहा प्रकार आॅक्टोबर २०१४ ते मे २०१५ दरम्यान मंडल गोल्ड स्मिथ दुकानात घडला

पुणे : व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाईकेली आहे. या चौघांनाही न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
मुजीबर रेहमान अब्दुल मन्नन शेख (वय ३६), अस्पीयारा बेगम मुजीबर रेहमान शेख (वय २८, दोघेही रा. पश्चिम बंगाल) या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर असगर अली अरसदअली शेख उर्फ बोपन (वय ३६) आणि असगरअली अब्दुल मन्नन शेख उर्फ टोटन (वय ३२, रा. रविवारपेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. याबाबत नासीर हुसेन मंडल (वय ४५, भवानीपेठ, कुमार प्रिमिअर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आॅक्टोबर २०१४ ते मे २०१५ दरम्यान गणेश पेठ येथील मंडल गोल्ड स्मिथ नावाच्या दुकानात हा प्रकार घडला होता.मंडल यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांचा मावस भाऊ अब्दुल कादीर शेख हा भागीदार आहे. यातील अटक केलेल्यांचा देखील सोन्याचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायामधूनच त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. याच संबधातून फिर्यार्दींनी आरोपींना १० किलो ९१० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले होते. त्यातील आरोपींनी केवळ ५ किलो ३०० ग्रॅम सोन परत केले. परंतु, उर्वरित सोने परत केलेच नाही. वारंवार सोन्याची मागणी केल्यानंतर सोन्याच्या बदल्यात रक्कम देतो असे आश्वासन दिले. मात्र, त्यानुसार पैसे देखील दिले नाही. याप्रकरणी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता, उर्वरीत सोने हस्तगत करायचे आहे, फसवणूक केलेल्या सोन्याची कोठे विल्हेवाट लावली, तसेच त्यांनी अशाच प्रकारे आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. गुन्हयाच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.  

Web Title: 5 and haif kg gold snatchers arrested from West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.