वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:37 AM2018-12-11T04:37:44+5:302018-12-11T04:38:04+5:30

पोलीस व महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू: आतापर्यंत ११६ वाहनांवर कारवाई

5 to 15 thousand penalties for driving a vehicle that would be hampering traffic | वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

Next

पुणे : शहरामध्ये वाहतुकीला अडथळा होईल अशी रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने, अनधिकृतपणे सोडून दिलेल्या वाहनांवर महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या वतीने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरामध्ये ही कारवाई सुरूअसून, आतापर्यंत ११६ वाहने उचलण्यात आली आहेत. अशा वाहनांना मोठ्या प्रणाणात दंड करण्यात येत असून, दुचाकीला ५ हजार, टेम्पो, रिक्षा १० हजार रुपये आणि कार, जीपसाठी तब्बल १५ हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे.

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप व वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी याबाबत संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. याबाबत सातपुते यांनी सांगितले, की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा ठरतील अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर लावली जातात. तर अनेक वाहने बेवारसपणे रस्त्यांवरच सोडून दिली जातात. यामुळे शहरातील वाहतुकील अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरातील बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून करण्यात येणाºया कारवाईव्यतिरिक्त ही कारवाई असणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला क्रेन, पार्किंगसाठी जागा, त्याचबरोबर सुरक्षारक्षक दिले आहे. संपूर्ण शहरामध्ये ही कारवाई सुरूराहणार आहे. अशा पद्धतीने शहरात पहिल्यांदाच कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक पद्धतीने वाहने लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या मदतीने शहरातील स्वारगेट, समर्थ, फरासखाना, विश्रामबागवाडा, खडक, कोथरूड, शिवाजीनगर, दत्तवाडी, वारजे या वाहतूक विभागातून एकूण ११६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने नदीपात्रात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
वाहने सोडवण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागणार आहे. घोले रस्ता आर्ट गॅलरी येथे दंड भरून वाहने सोडण्यात येतील.

पेठांमधील नागरिकांच्या झोपा उडाल्या
महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया आणि बेवारस वाहनांवर कारवाई सुरू आहे. शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत पार्किंगसाठी जागा नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.
या पैकी वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहनेदेखील या कारवाईअंतर्गत उचलण्यात आली आहेत. यामुळे पेठांमधील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दंडाची रक्कम व कारवाईबाबत अनेक तक्रारी येण्यास सुरुवात
झाली आहे.

पीएमपीवरसुद्धा कारवाई होईल
कायदा सर्वांना सारखा असतो. धोकादायक पद्धतीने पीएमपी रस्त्यावर लावण्यात आल्या असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल. शहरामध्ये नागरिकांनी धोकादायक पद्धतीने वाहने लावल्याचे आढळल्यास आणि महापालिका, वाहतूक शाखा यांच्याकडे तक्रार केल्यास करवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त सातपुते यांनी सांगितले.

Web Title: 5 to 15 thousand penalties for driving a vehicle that would be hampering traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.