केळद खिंडीत बस दरीत कोसळून २७ पर्यटक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:10 PM2018-06-26T15:10:06+5:302018-06-26T15:10:57+5:30

पर्यटक संध्याकाळी वेल्ह्याकडे येत असताना मुसळधार पाऊस असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस ५० फूट दरीत कोसळली.

27 tourists injured in bus crash in Kelad Khind | केळद खिंडीत बस दरीत कोसळून २७ पर्यटक जखमी

केळद खिंडीत बस दरीत कोसळून २७ पर्यटक जखमी

googlenewsNext
ठळक मुद्दे सुदैवाने एका झाडाला बस अडकल्याने खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. या झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. 

वेल्हे : तोरणा किल्ल्याच्या पलीकडील मढेघाट धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची बस केळद खिंडीमध्ये उलटली. या अपघातात २७ पर्यटक जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी ( दि. २५ जून ) रात्री आठच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुण्याहून मढेघाटामध्ये गेले होते. मिनीबस घेऊन गेलेले हे सर्व पर्यटक संध्याकाळी वेल्ह्याकडे परतत होते. केळद खिंडीमधून येत असताना बसचे ब्रेक निकामी झाले. मुसळधार पाऊस असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस ५० फूट दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने एका झाडाला अडकल्याने खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. या झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. 
खिंडीत बस कोसळताच पाठीमागून येणा-या अश्विन ब्रम्हे यांनी ही आरडाओरडा ऐकून आपली गाडी थांबवली. सोबत असलेल्या सहका-यांना घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. यावेळी शेजारच्या गावातील पिंटू शिळीमकर व समीर शिळीमकर हे सुद्धा मदतीला धावले. अंधारात आणि भर पावसात जखमी पर्यटकांना ब्रम्हे यांनी बाहेर काढून स्वत:च्या वाहनातून व अन्य खाजगी वाहनांमधून वेल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खूळे यांना संपर्क साधून उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले. जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर चालक तुषार येनपुरे व डॉ. बोरसे यांनी १०८ रुग्णवाहिकेतून  त्यांना पुण्यामध्ये हलविण्यात आले. 

Web Title: 27 tourists injured in bus crash in Kelad Khind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.