ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:33 PM2018-08-20T20:33:57+5:302018-08-20T20:40:16+5:30

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल

26 Sassoon doctors going to kerla for service | ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत

ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत

Next
ठळक मुद्देपुरग्रस्तांची आरोग्य तपासणी : महापुराच्या तडाख्यानंतर रोगराई पसरण्याची भीतीमहापुराच्या जोरदार तडाख्यानंतर आता केरळमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त पुरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी पुण्यातून १८ डब्यांची रेल्वेगाडी सोमवारी केरळला रवाना

पुणे : पुरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयातील २६ डॉक्टर्स सोमवारी केरळला रवाना झाले. त्यांच्याकडून केरळच्या पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी तसेच उपचार केले जाणार आहेत. 
महापुराच्या जोरदार तडाख्यानंतर आता केरळमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कमी झाला असून पुराचे पाणीही ओसरू लागले आहे. पुरामुळे सर्वत्र गाळ, कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने विविध संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. सर्व पुरग्रस्तांना विविध ठिकाणी छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर देशभरातून शेकडो डॉक्टर्स केरळला रवाना झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टरांचाही समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल झाले. 
ससूनच्या टीममध्ये मेडिसिन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, रोगप्रतिबंधक  या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. केरळमध्ये सुमारे ९ लाख नागरिकांना विविध छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथील एका छावणीमध्ये हे डॉक्टर रुग्णांची सेवा करतील. पुढील तीन-चार दिवसांत ससून व जे.जे. रुग्णालयातील आणखी सुमारे १०० डॉक्टरांची टीम केरळला रवाना केली जाऊ शकते, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. 
----------------
रेल्वेगाडी केरळला रवाना
पुरग्रस्त भागात अडकलेल्या केरळमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी पुण्यातून १८ डब्यांची रेल्वेगाडी सोमवारी पहाटे ३ वाजता केरळला रवाना झाली. नागरिकांची संख्या जास्त असल्याने देशाच्या विविध भागातून रिकाम्या रेल्वेगाड्या केरळमध्ये पाठविण्यात येत आहे. या सर्व गाड्यांमधून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल. दक्षिण रेल्वेकडून या गाड्यांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: 26 Sassoon doctors going to kerla for service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.