'काळ्या जादूने तुम्हाला नष्ट करून टाकू ' सांगत कुटुंबाकडून २५ लाख लुबाडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 09:49 PM2019-01-23T21:49:19+5:302019-01-23T21:50:22+5:30

काळ्या जादूने तुम्हाला नष्ट करून टाकू अशी भीती दाखवत एका कुटुंबाला २५ लाख रुपयांना लुबाडल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे

25 lakhs looted from the family saying, 'Let me destroy you with black magic' | 'काळ्या जादूने तुम्हाला नष्ट करून टाकू ' सांगत कुटुंबाकडून २५ लाख लुबाडले 

'काळ्या जादूने तुम्हाला नष्ट करून टाकू ' सांगत कुटुंबाकडून २५ लाख लुबाडले 

Next

पुणे :काळ्या जादूने तुम्हाला नष्ट करून टाकू अशी भीती दाखवत एका कुटुंबाला २५ लाख रुपयांना लुबाडल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हडपसर येथील काळेपडळ परिसरात घडली.

              या प्रकरणी काळेपडळ येथील  दिवाकर राजपूत विश्वकर्मा(वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात निवेदना माधवी ,अस्मिता राव, विषेश्टा राधा,संगीता भिसे, सुनील देव, वसंत पाटील, रूपाली पलटणे, आदित्य महाडिकर, अमित वनासरे, अमित गायकवाड, राजेश वागले याच्या जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१८ या सात वर्षांत हा प्रकार घडला. आरोपींनी आंध्र प्रदेश येथील संत यांचे अनुयायी असल्याचे सांगून एका कुटुंबाला काळ्या जादूची भीती घातली. होम हवन न केल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल, असे सांगून २४ लाख ६५ हजार रुपये उकळले. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एच.बी. खोपडे करीत आहेत.

Web Title: 25 lakhs looted from the family saying, 'Let me destroy you with black magic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.