लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:02 PM2019-05-11T14:02:44+5:302019-05-11T14:05:31+5:30

मुंबईच्या बंदरातून वातानुकूलित कंटेनर जहाजामार्फत ही कलिंगड दुबईला जाणार आहेत.

23 tonnes of sugarking water menon of Lingoli going to Dubai | लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना

लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना

Next
ठळक मुद्दे६५ दिवसांत उत्पन्न : सव्वादोन एकरांत कलिंगडाची शेतीकलिंगडचे रंग, चव, पाहून २३ टन कलिंगडाची दुबईसाठी निवड

दौंड : लिंगाळी (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ जगदाळे सव्वादोन एकरांत शुगरकिंग या जातीच्या कलिंगडाचे जोमाने पीक घेतले. दरम्यान, उत्पादित केलेल्या कलिंगडापैैकी २३ टन कलिंगड दुबईला निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. 
मुंबईच्या बंदरातून वातानुकूलित कंटेनर जहाजामार्फत ही कलिंगड दुबईला जाणार आहेत. साधारणत: आठवडाभरात ही कलिंगडे दुबईला पोहच होतील. रमजान सणामुळे दुबईत कलिंगडला मोठी मागणी असते. त्यानुसार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात दुबईला कलिंगडाची निर्यात केली जाते.  विकास नागवडे आणि रमया अजिजकुमार या दोघांनी लिंगाळी येथे कलिंगडच्या शेतीला भेट दिली. कलिंगडचे रंग, चव, पाहून २३ टन कलिंगडाची निवड दुबईसाठी करण्यात आली आहे.  यासंदर्भात कलिंगड उत्पादक शरद जगदाळे व काशिनाथ जगदाळे व म्हणाले की, कलिंगडाचे १५ हजार रोपे आणली. सव्वा दोन एकरात ही रोपे लावण्यात आली. साधारणत: ६५ दिवसांनी परिपक्व झालेले कलिंगड शेततून काढण्यात आले. त्यानुसार तोडलेले २३ टन कलिंगड दुबईला निर्यात झाली.
 

Web Title: 23 tonnes of sugarking water menon of Lingoli going to Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.