खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 08:43 PM2018-07-21T20:43:19+5:302018-07-21T20:44:06+5:30

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

23 TMC water storage in the Khadakwasla project | खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील नद्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणांतील साठ्यात वेगाने वाढ

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, तुरळक पावसाच्या सरींमुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 
जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे परिसरात २, माणिकडोह ५, डिंभे, कळमोडी ७, भामा आसखेड १४, वडीवळे ४०, आंद्रा ८, पवना १२, मुळशी ३८, टेमघर ३०, वरसगाव १९, पानशेत १७ आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी परिसरात १३ आणि टेमघरला १० मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात २.४९ (६७.०९ टक्के), वरसगाव ८.४८ (६६.११ टक्के), पानशेत ९.९७ (९३.६६ टक्के) आणि खडकवासला धरण क्षेत्रात १.९७ टीएमसी (१०० टक्के) आहे. या चारही धरणात मिळून २२.२१ टीएमसी (७८.५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात चारही धरणांत मिळून १६.९९ टीएमसी पाणीसाठा होता. सायंकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणातून सायंकाळी पाच पर्यंत २ हजार ५६८ आणि सायंकाळी सात नंतर ४ हजार २८० क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 
डिंभे धरणांत ९.०७ (७२.५९ टक्के), कळमोडी १.५१ (१०० टक्के), चासकमान ७.३४ (९६.९० टक्के), भामा आसखेड ५.७१ (७४.४६ टक्के), पवना ७.३५ (८६.३५ टक्के) आणि मुळशी धरणांत १५.०२ (८१.३८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी २.२९ (६२.०२ टक्के), निरा देवघर ८.५८ (७३.१४ टक्के), भाटघर १६.८१ (७१.५४) आणि वीर धरणात ८.७७ (९३.२२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 
दरम्यान खडकवासला धरणापाठोपाठ येडगाव धरणातून ६६४, कळमोडी ६२८, चासकमान ५ हजार २७५, वडीवळे १ हजार ४५, कासारसाई पाचशे आणि मुळशी धरणातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील नद्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १०.११ टीएमसीवर (१८.८७ टक्के) गेला आहे. 

Web Title: 23 TMC water storage in the Khadakwasla project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.