वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात :२२ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 08:36 PM2019-05-31T20:36:36+5:302019-05-31T20:42:43+5:30

लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी पिकअप जीपगाडी पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात पिंपळगावजोगा धरणाच्या कालव्याचे कठड्याला धडकून झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले.

22 injured in road accidents at Alephata | वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात :२२ जण जखमी

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात :२२ जण जखमी

googlenewsNext

पुणे (आळेफाटा): लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी पिकअप जीपगाडी पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात पिंपळगावजोगा धरणाच्या कालव्याचे कठड्याला धडकून झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याचे खरशिंदे येथून जुन्नर तालुक्याचे ओतुर जवळील भोईरवाडी येथे पुणे नाशिक महामार्गाने लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी पिकअप जीपगाडी (क्रमांक एम एच 04 इबी 2596) ही आळेफाट्याजवळ आली असता परिसरातून जाणा-या पिंपळगावजोगा धरणाच्या कालव्याचे कठड्याला जोरात अडकल्याने टपावरील काहीजण कोरड्या कालव्यात पडले तर आतमधील काही जण गाडीच्या कडेला आदळले. 

या अपघातात जीपमधील संजय कुंडलिक लहांगे (वय 25) किसन गंगाराम लहांगे (वय 50) लहानुबाई कुंडलिक लहांगे (वय 40) लता दीपक लहांगे (वय 19) मंगल महादू लहांगे (वय 35) दीपक महादू लहांगे (वय 22) पुजा महादू लहांगे (वय 17) गणेश बाळू लहांगे (वय 18) संपत वामन लहांगे (वय 35) सारिका विजय लहांगे (वय 28) मैना सखाराम लहांगे (वय 26 सर्व रा खरशिंदे ता संगमनेर) वैशाली संतोष देशमुख (वय 30 रा चिंचपुर संगमनेर) नाना केशव गोडे (रा हिवरगावपठार ता संगमनेर) सुनिल दगडू लोहकरे (वय 27) राणी सुनिल लोहकरे (वय 20 रा वांदुळशेत राजुर ता अकोले) गोविंद उत्तम कोरडे (वय 30) हौसाबाई तान्हाजी नंदकर (वय 40) सुनिता रामनाथ लेंबे (वय 30) सीताबाई सोमनाथ नवले (वय 35) पराग नामदेव लेंडे (वय 29) नंदाबाई गोरक्षनाथ कौठे (वय 45) गीता नामदेव लेंडे (वय 40 सर्व रा कोळेवाडी म्हैसगाव ता राहुरी) हे अपघातात जखमी झाले. त्यांना जवळील दवाखान्यांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची खबर आळेफाटा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. 

Web Title: 22 injured in road accidents at Alephata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.