पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी १ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:50 AM2019-01-18T00:50:44+5:302019-01-18T00:50:48+5:30

बावधन झऱ्यातून येते रोज दीड लाख लिटर स्वच्छ पाणी

1 crore to maintain the natural resources of water | पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी १ कोटी

पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी १ कोटी

Next

पुणे : शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत असणारे झरे वाचविण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रशासनाने येत्या आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये बावधन येथील झरा आणि सिद्धेश्वर-वृद्धेश्वर झºयांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांचे संवर्धन या तरतूदीमधून होऊ शकेल. पिण्यासाठी दररोज लाखो लिटर पाणी या झºयांमधून मिळणार आहे. या झºयाबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन तरतूद करण्याची मागणी केली होती.


पुणे महापालिका प्रशासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आज सहा हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यामध्ये प्रथमच पाण्याचे नैसर्गिक स्रोत वाचविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. बावधन येथील झरा दररोज दीड लाख लिटर स्वच्छ पाणी देतो. त्यामुळे हा झरा वाचविला पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जलप्रेमी शैलेंद्र पटेल प्रयत्न करीत आहेत. सध्या या झºयातील पाणी वाया जात असून, आजूबाजूच्या महिला कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करतात. परंतु, भूगर्भ विभागाकडून या पाण्याचे परीक्षण झाले असून, ते पिण्यायोग्य असल्याचा अहवाल अधिकाºयांनी दिल्याचे पटेल यांनी सांगितले.

लाखो लिटर पाणी मिळू शकते
सध्या पिण्याच्या पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात चांगली जुंपली आहे. त्यामुळे या झºयातील लाखो लिटर पाणी वाचविले, तर त्याचा फायदा पुणेकरांना होईल. इकॉलॉजिकल सोसायटी, डेक्कन कॉलेज, भूगर्भ जल विभाग यांनी या झºयाबाबत परीक्षण केले आहे. या सर्वांनी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे नमूद केले आहे.
या झºयाचे संवर्धन करायचे असेल, तर तेथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली पाहिजे. तरच, हा झरा आरक्षित होऊ शकतो. तसेच या झºयाला हेरिटेजचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पटेल यांनी सांगितले. बावधनच्या झºयाच्या आजूबाजूला जैवविविधता आहे. त्यामुळे येथे जैवविविधता उद्यान उभारले पाहिजे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी येऊन झरा काय असतो, त्याचाही अभ्यास करता येईल, असेही पटेल म्हणाले.

Web Title: 1 crore to maintain the natural resources of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी