उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:51 AM2019-04-24T02:51:05+5:302019-04-24T07:01:53+5:30

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चार जणांविरोधात वॉरंट

Warrant against Uddhav Thackeray, Sanjay Raut; Maratha muk Morcha insult will fall in the fall? | उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

googlenewsNext

पुसद (यवतमाळ) : मराठा मूक मोर्चाबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल दाखल खटल्यात दैनिक ‘सामना’चे संपादक आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, मुद्रक-प्रकाशक राजेंद्र भागवत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई या चौघांविरुद्ध सोमवारी पुसदच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने २०१६ मध्ये संपूर्ण राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. याचसंदर्भात २५ सप्टेंबर २०१६ रोजी दै. ‘सामना’ या वृत्तपत्राने ‘विराट मुका मोर्चा’ या शीर्षकाखाली व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच शहीद सैनिकांबाबत ‘ते डेंग्यूच्या हल्लात शहीद झाले, सीमेवर नाही’ असे संबोधले होते. त्यावरून येथील अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २७ सप्टेंबर २०१६ ला पुसद न्यायालयात बदनामीबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ११ मार्चला समन्स बजावून २२ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कुणीही हजर झाले नाही. आता पुन्हा समन्स बजावण्यात आला आहे.

Web Title: Warrant against Uddhav Thackeray, Sanjay Raut; Maratha muk Morcha insult will fall in the fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.