सपा-बसपाचं जागावाटप ठरलं! मोठ्या शहरांतील 14 जागांवर सपा देणार भाजपाला शह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:37 PM2019-02-07T12:37:50+5:302019-02-07T12:39:51+5:30

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाली आहे.

sp bsp seats fixed sp can challenge bjp on 8 out of 14 seats in big cities | सपा-बसपाचं जागावाटप ठरलं! मोठ्या शहरांतील 14 जागांवर सपा देणार भाजपाला शह

सपा-बसपाचं जागावाटप ठरलं! मोठ्या शहरांतील 14 जागांवर सपा देणार भाजपाला शह

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बसपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्यामुळे यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. या आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बसपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती. यातील तीन जागांवर सपा विजय मिळवू शकते. तर तीन जागांवर काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे.

2014मध्ये काँग्रेसनं केवळ अमेठी आणि रायबरेली या दोन जागा जिंकल्या होत्या. तसेच जिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी होती त्या जागाही भाजपानं जिंकल्या होत्या. तर बसपा तिसऱ्या स्थानी होती. भाजपाची शहरी भागात मोठी ताकद आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपानं मोठ्या बहुमतानं उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच जागा जिंकल्या होत्या. सपा आणि बसपानं आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. ऊर्वरित 38-38 लोकसभा जागांचं वाटप केलं होतं. जागांचं वाटप हे दोन्ही पक्षांचं त्या त्या प्रभागात असलेल्या ताकदीनुसार करण्यात आलं आहे, असंही सपाच्या नेत्यानं सांगितलं आहे. तर इतर पक्षांनीही या आघाडीत सहभागी व्हावं, मोर्चेबांधणी आता केली जात आहे. सपा मुरादाबाद, गाझियाबाद, लखनऊ, कानपूर, झांसी, अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीमध्ये लढण्याची शक्यता आहे.

बसपाच्या समर्थनानं गेल्या वेळी समाजवादी पार्टीनं पोटनिवडणुकीत गोरखपूर आणि फुलपूर या मतदारसंघांत भाजपाला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला होता. 2014मध्येही सपा मुरादाबाद, गाझियाबाद, लखनऊ, कानपूर, झांसी, अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीच्या जागांवर दोन नंबरवर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी हा मतदारसंघ असल्यानं यंदा भाजपलाही सपा-बसपाच्या आघाडीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Web Title: sp bsp seats fixed sp can challenge bjp on 8 out of 14 seats in big cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.