हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:29 PM2019-03-20T12:29:47+5:302019-03-20T12:36:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर प्रियंका गांधींनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

priyanka gandhi attacks on pm narendra modi in varanasi | हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

Next

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर प्रियंका गांधींनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या निमित्तानं प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदी आमने-सामने आले आहेत. ब्लॉगमध्ये मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली, त्याचा प्रियंकानंही पलटवार केला. इलाहाबादहून काशीपर्यंत गंगा यात्रा करणाऱ्या प्रियंका यांना मिर्जापूरमध्ये मोदींच्या ब्लॉगसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या, त्यांना आमच्यावर जेवढी टोकाची टीका करायची आहे, तेवढी करावी, पण आम्ही त्याच जोशात लढणार आहोत. त्यांच्या विरोधात बोलण्यास लोक घाबरतात, पण आम्ही त्यांना घाबरत नाही. जे लोक सत्तेत असतात, त्यांना वाटतं इतरांना आपण घाबरवू, पण आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. 

गेल्या पाच वर्षांत भाजपानं देशातल्या सर्व लोकशाही संस्थांना नेस्तनाबूत केलं आहे. आपण सर्व ज्या व्यवस्थेचे भाग आहोत, त्या व्यवस्थेलाच त्यांनी नुकसान पोहोचवलं आहे. पंतप्रधानांनी लोकांना मूर्ख समजू नये, जनतेला सर्वकाही कळतं. मोदींनी जनतेला मूर्ख बनवणं आधी बंद करावं, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. 

मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, आमच्या सरकारनं कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडलं. एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेनं काम करतं.  काँग्रेसनं देशाच्या संस्थांना कमकुवत केलं आहे. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसनं आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसनं संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारनं सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. 

काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं एक साधन समजलं. त्यामुळेच जवानांना काँग्रेसनं कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले. 

Web Title: priyanka gandhi attacks on pm narendra modi in varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.