संभाजी भिडेंच्या पाठीशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 08:49 PM2018-03-26T20:49:54+5:302018-03-26T20:49:54+5:30

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री सुशीलकुमार यांनी पुण्यात संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा शाब्दिक वार त्यांनी केला.

Prime Minister and Chief Minister supports sambhaji bhide : Sushilkumar Shinde | संभाजी भिडेंच्या पाठीशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे

संभाजी भिडेंच्या पाठीशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे

ठळक मुद्देसंभाजी भिडे यांच्या अटकेची केली मागणी ऍट्रॉसिटीबाबत सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी

पुणे : संभाजी भिडे यांना अटक करण्याची गरज असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहे असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी.जे.खताळ पाटील यांच्या शतक महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. 

      भीमा कोरेगाव घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी एकबोटेंना एक न्याय आणि भिडे यांना वेगळा न्याय दिला जात असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर हे तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत त्वरित कारवाई करावी असेही त्यांनी सुचवले. ऍट्रॉसिटी कायद्याच्या धोरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान त्यांनी केले.याबाबत लवकरात लवकर पुनर्रयाचिका दाखल करण्यात यावी अन्यथा आंदोलने होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. लिंगायत समाजाला कर्नाटक सरकारने दिलेल्या अल्पसंख्यांक दर्जावरही त्यांनी भाष्य केले. या निर्णयाबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन केले. ही मागणी घेऊन लिंगायत समाजाचे लोक माझ्याकडे आले होते असेही ते म्हणाले. 

Web Title: Prime Minister and Chief Minister supports sambhaji bhide : Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.