दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:35 AM2019-04-16T04:35:28+5:302019-04-16T04:36:00+5:30

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’

Others say donkeys are not our culture - Shinde | दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे

दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे

googlenewsNext

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’
दोन दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची एका हॉटेलात भेट झाली होती. या भेटीचे छायाचित्र आणि संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर ‘काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात, पण त्याचं राजकारण करणं काँग्रेसलाच जमतं,’ अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली होती.
या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, शिवराज पाटील यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यावर लिफ्टमध्ये नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची भेट झाली. त्यांनीच आंबेडकर येथेच आहेत, असे सांगितले. त्यामुळे मी तिथे गेलो. तेथे फक्त त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांनी फोटो काढले. ते फोटो आम्ही व्हायरल केलेले नाहीत.

Web Title: Others say donkeys are not our culture - Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.