Not about Pak, talk about India - Priyanka Gandhi | पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी
पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी

फतेहपूर सिक्री : भाजपचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर निवडणुकांच्या काळात पाकिस्तानविषयी नव्हे, भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मार्गदर्शन केले.


प्रियांका यांनी महिला, युवक, शेतकरी आणि जवानांसाठी काय केले, आणि काय करणार आहेत, याबाबत भाजपने सांगितले पाहिजे, असे सांगून तुमच्या दारात उघड्या पायांनी आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही का भेटला नाही, त्यांची दु:खे का समजून घेतली नाहीत, असा प्रश्न प्रियांका यांनी विचारला.

मोदी सरकारला लोकशाहीबद्दल ना अभिमान आहे, ना जनतेबद्दल.ते खरे राष्ट्रवादी असते तर त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला असता, अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी हक्क व अधिकार मागितला, त्यांना मारहाण केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही अनेक मोठ्या योजना कार्यान्वित करु, ज्याचा जनतेला फायदा होईल. काँॅग्रेसने नेहमी जनतेचाच फायदा पाहिला, त्यांना वाचवले आहे.


Web Title: Not about Pak, talk about India - Priyanka Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.