‘राष्ट्रवादी’चा उमेदवार ठरता ठरेना, प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:19 AM2019-01-23T06:19:29+5:302019-01-23T06:19:47+5:30

बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी भाजपाकडून जवळपास निश्चित झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अजूनही सामसूम आहे.

'Netanyadi' candidate is not decided, Pritam Munde again in the ring | ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार ठरता ठरेना, प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात

‘राष्ट्रवादी’चा उमेदवार ठरता ठरेना, प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात

googlenewsNext

- सतीश जोशी
बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी भाजपाकडून जवळपास निश्चित झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अजूनही सामसूम आहे. प्रीतम मुंडे यांना कडवी लढत देणारे उमेदवार म्हणून आ.जयदत्त क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित यांच्याकडे बघितले जाते. दोघेही तगडे उमेदवार आहेत; परंतु स्वत:हून कुणीही लोकसभा लढण्यास इच्छुक नाही. दुसऱ्यास घोड्यावर बसवून स्वत:ची सुटका करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बीड मतदारसंघात ओबीसी मतदारांचा प्रभाव आहे. उसतोड कामगारांचे गठ्ठा मतदान आहे. बहुतांश मते भाजपाच्या पारड्यात आहेत. मुंडेंना कडवी लढत देण्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून माजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर यांचे नाव राष्टÑवादीच्या जिल्हा बैठकीत पुढे करण्यात आले. परंतु, त्याच बैठकीत आपण लोकसभा लढविणार नाही, असे क्षीरसागरांनी निक्षून सांगितल्याने त्यांच्या नावाची चर्चा थांबली होती. माजी खा.केशरकाकू क्षीरसागर आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यातील राजकीय सख्य साºया जिल्ह्याला माहीत आहे. ही परंपरा जयदत्त, भारतभूषण बंधू आणि पंकजा यांनीही पुढे सुरू ठेवून जिल्ह्यात प्रस्थापित नेतृत्वास नेहमीच काटशह देऊन बाजू आपल्याकडे पलटविली आहे. त्यामुळे मुंडे विरुद्ध क्षीरसागर अशी लढत शक्य नाही. सध्यातरी अमरसिंह पंडित यांचेच नाव चर्चेत आहे . शरद पवार यांनी आदेश दिला तर रिंगणात उतरू, असे पंडितांनी स्पष्ट केले आहे.
बीड लोकसभा मतदार संघावर काँग्रेसनेही दावा केला असला तरी त्यात फारसा जोर नाही. जिल्ह्यात कमकुवत असलेल्या काँग्रेसने तडजोडी करून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपाला सहकार्य केले. विधानसभेच्या सहापैकी फक्त परळीची जागा काँग्रेस लढविते, यावरून काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज येईल. युती तुटली तर शिवसेनेकडेही लोकसभेसाठी सध्यातरी कुणी तगडा उमेदवार इच्छूक दिसत नाही.
पंकजांनी सुरेश धसांना भाजपात आणून क्षीरसागरांच्या सहकार्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवून अशक्यप्राय असा विजय मिळविला आणि जि.प.त केलेल्या सहकार्याची परतफेड केली. सुरेश धसांच्या रुपाने पक्षास मराठा नेतृत्व देऊन आ. विनायक मेटेंना नुसता शह दिला असे नाही तर त्यांचे कट्टर समर्थक
राजेंद्र मस्केंना ‘शिवसंग्राम’मधून
बाहेर काढले. आतापर्यंत तरी मुंडे भगिनींचे डावपेच त्यांचे बंधू धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाशदादा सोळंके यांना भारीच ठरले आहेत. राष्टÑवादीत असले तरी क्षीरसागर बंधुंच्या ताकदीचाही त्यांनी धसांच्या मदतीने पुरेपूर फायदा उचलत
जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्यची निवडणूक जिंकली. क्षिरसागर यांनी नकार दिल्याने राष्टÑवादीचा उमेदवार कोण, याचीच सध्या उत्सुकता आहे.
>सध्याची परिस्थिती
तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीवेळी जसे भावनिक वातावरण होते, तसे आता नाही. सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहेत. शिवाय, आ. सुरेश धस हे स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मेटेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांची नाराजी भोवणार. आ.सुरेश धस यांनी जि.प.मध्ये राष्टÑवादीशी बंडखोरी करून भाजपाला सत्ता स्थापनेत सहकार्य केले. पंकजा यांनीही त्यांना विधान परिषदेवर पाठवून भाजपाची ताकद वाढविली.

 

 

Web Title: 'Netanyadi' candidate is not decided, Pritam Munde again in the ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.