'नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल तडजोड केली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:58 AM2019-04-20T03:58:01+5:302019-04-20T03:59:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल कधीच तडजोड केली नाही.

'Narendra Modi did not compromise corruption' | 'नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल तडजोड केली नाही'

'नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल तडजोड केली नाही'

googlenewsNext

गुमाला /लोहारडागा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे विरोधकांची महाआघाडी त्यांना सत्तेपासून दूर करू पाहत आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी येथे सांगितले. आदिवासी विकास विभागाचे केंद्रीय मंत्री
आणि गुमाला जिल्ह्यातील लोहारडागा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन भगत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
दास म्हणाले, ‘मोदी यांना गरिबी काय असते ते माहिती
आहे. त्यांची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कोणत्याही तडजोडीविना सुरू आहे. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले. त्यांना गरिबी काय माहीत असणार? ते आदिवासींविषयी कळवळा व्यक्त करतात, मात्र भूमिपुत्र असलेल्या आदिवासींबद्दल निर्णय घ्यायचे म्हणताच, ते पाऊल मागे घेतात.
दास म्हणाले, ‘विरोधक म्हणजे तीच माणसे आहेत, ज्यांनी वाळूची लूट केली, मुंबईतील बड्या ठेकेदारांना ती विकली. कोळसा घोटाळा आणि चारा घोटाळ्यातही त्यांचा हात आहे. 

Web Title: 'Narendra Modi did not compromise corruption'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.