जाती-धर्माच्या नावावर देश तोडण्याचा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:04 AM2019-04-16T04:04:06+5:302019-04-16T04:05:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे जनतेचे मोठे शत्रू आहेत. त्या दोघांनाही देशाचे तुकडे करायचे आहेत

Narendra Modi-Amit Shah tried to break the country in the name of caste and religion | जाती-धर्माच्या नावावर देश तोडण्याचा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा प्रयत्न

जाती-धर्माच्या नावावर देश तोडण्याचा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा प्रयत्न

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे जनतेचे मोठे शत्रू आहेत. त्या दोघांनाही देशाचे तुकडे करायचे आहेत असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केला आहे.
येथे एका प्रचारसभेत ते म्हणाले की, जात, धर्म, वंश यांच्या आधारे देशामध्ये फूट पाडण्याचे काम मोदी व शहा करत आहेत. मात्र भाजपच्या चालींना बळी पडायचे नाही असे जनतेने ठामपणे ठरविले आहे. भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. सर्वांना समान अधिकार व संधी देणाऱ्या राज्यघटनेचे स्वरूपच भाजपला बदलायचे आहे. कोणत्याही धर्माचा, श्रद्धांचा अंगिकार करण्याचे स्वातंत्र्य देणाºया याच राज्यघटनेने ३५ अ, ३७० कलमांन्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. या तरतुदीला भाजपने नेहमीच विरोध केला आहे.
जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा खिळखिळा करण्यासाठी भाजप आपल्या हस्तकांचा वापर करत आहे, असा आरोप अब्दुल्ला यांनी केला. त्यांचा रोख पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांकडे होता. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये बिगरकाश्मिरींना जमिनी, मालमत्ता विकत घेता यायला हव्यात यासारखे बिनमहत्त्वाचे प्रश्न भाजप मुद्दामहून उकरून काढत आहे. आमचे हक्क आम्ही कोणालाही छिनावून देणार नाही. भारत यापुढे धर्मनिरपेक्ष राहील वा नाही हे आगामी लोकसभा निवडणुकांनंतर ठरेल. मतदारांकडून यावेळी गफलत घडल्यास त्याचे गंभीर परिणाम भावी पिढ्यांना भोगावे लागतील. (वृत्तसंस्था)
>‘हा तर आगीशी खेळ’
फारुक अब्दुल्ला म्हणाले की,
जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा व अधिकार हे भाजपच्या डोळ््यांत सलत असल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यावरून स्पष्ट झाले आहे. ३५अ, ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन या पक्षाने जाहिरनाम्यात दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येचे सध्याचे स्वरुप त्यांना बदलायचे आहे. ही भूमिका घेऊन भाजप आगीशी खेळत आहे.
>युवकांच्या चेहºयावरील दु:खाचा विचार करा
मोदी सरकारवर टीका करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, की या सरकारचा प्रचार पाहिला तर असे वाटते, की या पाच वर्षांतच देशात साºया सुधारणा झाल्या. पण वस्तुस्थिती तशी नाही. उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या प्रचारदौºयात अनेक युवकांच्या चेहºयावर बेकार असल्याचे दु:ख पाहायला मिळाले आहे. कर्जात बुडालेले शेतकरी दिसत आहेत. मोदी सरकार श्रीमंत उद्योगपतींना कोट्यवधी रुपये देत असेल तर आम्ही गरीबांना ७२,000 रुपये का नाही देऊ शकत? आम्ही आरोग्य, शिक्षणासहित सर्वच क्षेत्रात काम करूइच्छित आहोत.

Web Title: Narendra Modi-Amit Shah tried to break the country in the name of caste and religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.