भाजप मुख्यालयात खासदाराने चौकीदाराकडे दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:27 AM2019-04-24T03:27:31+5:302019-04-24T03:28:42+5:30

लोकसभेसाठी पुन्हा तिकीट न मिळाल्याचा पक्षश्रेष्ठींवरील राग चौकीदाराकडे राजीनामा देऊन व्यक्त

MP resigns at BJP headquarters | भाजप मुख्यालयात खासदाराने चौकीदाराकडे दिला राजीनामा

भाजप मुख्यालयात खासदाराने चौकीदाराकडे दिला राजीनामा

Next

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : भाजपचे मछलीशहरचे (उत्तर प्रदेश) खासदार रामचरित्र निषाद यांनी त्यांना लोकसभेसाठी पुन्हा तिकीट न मिळाल्याचा पक्षश्रेष्ठींवरील राग मंगळवारी येथील पक्ष मुख्यालयात जात चौकीदाराकडे राजीनामा देऊन व्यक्त केला.

राजीनामा देताना ते म्हणाले की, माझे तिकीट कापले गेले याबद्दल मला काही म्हणायचे नाही. दु:ख याचे आहे की, जी व्यक्ती पाच वर्षांपूर्वी आमच्याकडून पावणे दोन लाख मतांनी पराभूत झाली तिला उमेदवारी दिली गेली याचे. जर स्थानिक नेता किंवा पदाधिकाऱ्याला तिकीट दिले गेले असते तर काही तक्रार नव्हती. परंतु, ज्याने पक्षासाठी गेल्या पाच वर्षांत काहीही काम केले नाही त्याला संधी दिली गेली.
आपापसात भांडून एकमेकांना संपवण्याचा जो खेळ सुरू आहे त्यात भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये मोठे नुकसान होत आहे. पोट निवडणुकीत हेच झाले. या वातावरणात भाजप ७४ जागा जिंकण्याचे स्वप्न बघत आहे. असा चमत्कार समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष युतीबाबत घडू शकतो, असे निषाद म्हणाले.

निषाद यांना सप-बसप-रालोद आघाडीने मिर्झापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. येथे त्यांच्या स्पर्धक आहेत भाजपचा मित्रपक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल. भाजपने रामचरित्र निषाद यांचे तिकीट कापून नुकतेच बसपतून भाजपत आलेले बी. पी. सरोज यांना मछली शहर मतदारसंघातून तिकीट दिले. गेल्या निवडणुकीत निषाद यांनी सरोज यांना जवळपास १.७५ लाख मतांनी पराभूत केले होते. निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांचा मुलगा प्रवीण निषाद भाजपमध्ये येणे महायुतीस झटका मानला जात आहे.

Web Title: MP resigns at BJP headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.