मोदींनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, कुमारस्वामी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:54 AM2019-04-15T04:54:35+5:302019-04-15T04:56:15+5:30

नरेंद्र मोदी हे टक्केवारी पार्श्वभूमीचे पंतप्रधान असल्याने त्यांना टक्केवारीशिवाय काही दिसतच नसल्याचा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला.

Modi should not teach morality, criticize Kumaraswamy | मोदींनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, कुमारस्वामी यांची टीका

मोदींनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, कुमारस्वामी यांची टीका

Next

बंगळूरू : नरेंद्र मोदी हे टक्केवारी पार्श्वभूमीचे पंतप्रधान असल्याने त्यांना टक्केवारीशिवाय काही दिसतच नसल्याचा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. मोदी यांच्याकडून नैतिकतेचे धडे घेण्याची मला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या प्रचारसभांमधून कर्नाटकातील जेडीएस-कॉँग्रेसचे सरकार हे २० टक्क्यांचे सरकार असल्याची जोरदार टीका केली होती. त्यावर कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी यांच्यावर हल्ला चढविला. मोदी यांची पार्श्वभूमी टक्केवारीची असल्याने त्यांना टक्केवारीशिवाय काहीच दिसत नसल्याचेही ते म्हणाले. मोदी यांनी कर्नाटकातील जेडीएस - कॉँग्रेसवर घराणेशाहीचाही आरोप केला होता. त्याचाही कुमारस्वामी यांनी तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला.


कर्नाटकातील जेडीएसच्या नेत्यांवर आयकर विभागाकडून टाकण्यात येणाऱ्या छाप्यांबाबत मोदी यांनी ‘कर नाही त्याला डर कशाला?’ असा प्रश्न केला होता. त्यावर कुमारस्वामी म्हणाले, आम्ही काहीही चुकीचे केले नसल्याने आम्हाला घाबरण्याचे कारण नाही.

Web Title: Modi should not teach morality, criticize Kumaraswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.