निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात?

By अतुल कुलकर्णी | Published: April 18, 2019 05:03 AM2019-04-18T05:03:08+5:302019-04-18T05:03:53+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे.

MNS candidate who does not contest elections, in whose paws | निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात?

निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात?

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाच्या सीडीज बनवून त्या गावागावात दाखवल्या जात आहेत. हे काम पडद्यामागून काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असल्याची चर्चा आहे.
राज यांच्या भूमिकेचा मुंबई, नाशिक, पुणे या भागात चांगला परिणाम होईल, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. शिवाय राज यांनी मोदी कधी, काय बोलले होते व नंतर ते कसे वागले, बोलले यातील फरक त्यांच्याच व्हिडीओ क्लीप द्वारे दाखवणे सुरु केल्यामुळे भाजप नेत्यांची बोलती बंद झाली आहे. राज यांच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, म्हणून त्यांच्या सभांचा खर्च कोण करते, अशी टीका भाजप नेते करत आहेत, हिंमत असेल तर त्यांनी उत्तरे द्यावे असे आव्हान राष्टÑवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला दिले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त २७.५६ टक्के मते मिळाली होती. याचा अर्थ ७२.४४ टक्के लोकांनी भाजपाला राज्यात नाकारले होते. त्याचवेळी दोन्ही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती ३४.३२ टक्के होती, त्यामुळे आपल्याला जनतेला पाठींबा होता अशा भ्रमात भाजपने राहू नये, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकमतशी बोलताना केली.
गेल्या निवडणुकीत मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती तर शिवसेनेच्या मतांमध्ये घट झाली होती. राष्टÑवादीच्या मतांमध्ये २ टक्के वाढ झाली होती. आता भाजप -शिवसेना व काँग्रेस, राष्टÑवादी एकत्र असले तरी भाजप- सेनेतील सुंदोपसुंदी अनेक ठिकाणी तीव्र झाली आहे.
>आम्ही मोदी सरकार किती खोटारडे आहे हे सांगत होतोच, पण राज ठाकरे यांच्या मुखातून ते प्रभावीपणे समोर येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन होत आहे.
-जयंत पाटील,
प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी
>२०१४ मधील मतांची टक्ेकवारी
पक्ष लोकसभा विधानसभा फरक
(मे २०१४) (सप्टें. २०१४)
काँग्रेस १८.२९% १८.१०% - ०.१९%
राष्टÑवादी १६.१२% १७.९६% + १.८४%
भाजपा २७.५६% ३१.१५% + ३.५९%
शिवसेना २०.८२% १९.८०% - १.०२%
मनसे १.४७% ४.१८% + २.७१%
बसपा २.६३% २.३३% - ०.०३%

Web Title: MNS candidate who does not contest elections, in whose paws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.