मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर, आघाडीच्या बैठकांना हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:50 AM2019-04-16T00:50:19+5:302019-04-16T00:51:19+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

Missing attendance from MNS office-bearers | मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर, आघाडीच्या बैठकांना हजेरी

मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर, आघाडीच्या बैठकांना हजेरी

Next

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमचे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि पक्षाचे सहसचिव इरफान शेख यांनी पाटील यांची भेट घेतली व मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाल्याचा दावा केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबाबतची भूमिका स्पष्ट न केल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मनसेच्या काहींची भूमिका आघाडीच्या उमेदवाराला आगरी समाजातील असल्याने सहकार्य करण्याची होती, तर काही पदाधिकाºयांना विशेषकरून शिवसेनेतून मनसेत दाखल झालेल्यांना ठाकरे यांच्या आदेशानंतरही राष्ट्रवादीची पाठराखण करण्यात अडसर वाटत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मनसेच्या नेत्यांनी चर्चा करून हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकांना मनसेच्या काही पदाधिकाºयांनी उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे.


सोमवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील एका हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आदींची बैठक पार पडली.
राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश शिंदे यांनी प्रचाराच्या नियोजनासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीणचे विधानसभा अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली शहर संघटक तथा माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, निलेश भोसले, प्रकाश माने आणि सुदेश चुडनाईक आदी मनसे पक्षाच्या पदाधिकाºयांनी हजेरी लावली होती. पाटील यांचा प्रचार कशा पद्धतीने करायचा, याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम मात्र उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Missing attendance from MNS office-bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.