राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 09:02 PM2019-04-13T21:02:06+5:302019-04-13T21:06:28+5:30

सभांच्या खर्चाबद्दल भाजपाचं निवडणूक आयोगाला पत्र

lok sabha election mns chief raj thackeray exposing pm narendra modi and bjp president amit shah says congress | राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

Next

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्याचा प्रचार केला जात असल्याने मोदी आणि शाह या जोडीचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडत चालला आहे. यामुळे जनमत दूर चालल्याने, हतबलतेतून भाजपाकडून राज ठाकरेंच्या सभेवर होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेतला जात असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आपला काहीही संबंध नाही हे राज ठाकरे यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे. मोदी शाह यांच्या विचारधारेतून मुक्त होणे यातच देशहित आहे. मोदी शाह यांच्या विचारधारेमुळे जनतेच्या मनात भाजपाबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपाचा घसरलेला पाय सावरण्याकरता त्या पक्षाचीही मोदी शाह यांच्या विचारांपासून सुटका होण्याची गरज आहे, असे सचिन सावंत म्हणाले. 

राज ठाकरेंमुळे देशहिताबरोबरच भाजपचे हित जोपासले जात असल्याने राज ठाकरेंच्या सभांचा खर्च भाजपाने आपल्या नावावर उचलला तरी काय हरकत आहे? अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. राज ठाकरेंच्या सभांबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मनसे एकही जागा लढवत नसताना राज ठाकरे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. राज यांच्या सभा कोणासाठी आहेत? या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार? असे प्रश्न विचारत तावडेंनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र भाजपा लोकसभा निवडणूक व्यवस्थापनाच्या समितीच्या वतीने तावडेंनी हे पत्र लिहिले आहे. 
 

Web Title: lok sabha election mns chief raj thackeray exposing pm narendra modi and bjp president amit shah says congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.