Lok Sabha Election 2019: A mention of the community against the deprived leaders of Ambedkar | Lok Sabha Election 2019: आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या उमेदवारापुढे समाजाचा उल्लेख
Lok Sabha Election 2019: आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या उमेदवारापुढे समाजाचा उल्लेख

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक डाव खेळला आहे.
अ‍ॅड. आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडी उभी केली आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.

उमेदवारांची नावे अशी- धनराज वंजारी (वर्धा), किरण रोडगे (रामटेक), एन. के. नान्हे (भंडारा गोंदिया), रमेश गजबे ( गडचिरोली चिमूर), राजेंद्र महाडोळे (चंद्रपुर), प्रवीण पवार ( यवतमाळ-वाशिम), बळीराम सिरस्कार (बुलडाणा), गुणवंत देवपारे ( अमरावती), मोहन राठोड ( हिंगोली), यशपाल भिंगे (नांदेड), आलमगीर मोहम्मद खान ( परभणी), विष्णू जाधव ( बीड), अर्जुन सलगर ( उस्मानाबाद), राम गारकर (लातूर), अंजली बाविस्कर (जळगाव), नितीन कांडेलकर ( रावेर), शरदचंद्र वानखेडे (जालना), सुमन कोळी (रायगड), अनिल जाधव ( पुणे), नवनाथ पडळकर, (बारामती), माढा-विजय मोरे, सांगली- जयसिंग शेंडगे, सातारा- सहदेव एवळे, रत्नागिरी सिंधुदुर्ग- मारूती जोशी, कोल्हापूर- अरूणा माळी, हातकणंगले- अस्लम बादशाहजी सय्यद, नंदुरबार- दाजमल मोरे, दिंडोरी- बापू बर्डे, नाशिक- पवन पवार, पालघर- सुरेश पडवी, भिवंडी - ए.डी.सावंत, ठाणे- मल्लिकार्जुुन पुजारी, मुंबई दक्षिण- अनिल कुमार, मुंबई दक्षिण मध्य- संजय भोसले, ईशान्य मुंबई - संभाजी काशीद, मावळ- राजाराम पाटील, शिर्डी- अरूण साबळे


Web Title: Lok Sabha Election 2019: A mention of the community against the deprived leaders of Ambedkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.