निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:59 AM2019-04-30T07:59:03+5:302019-04-30T08:02:07+5:30

40 आमदार संपर्कात असल्याच्या मोदींच्या विधानाचा समाचार

lok sabha election 2019 Campaigning or horse trading tmc asks PM narendra modi | निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल

निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल

Next

सेरामपूर: तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पश्चिम बंगालमध्ये जनसभेला संबोधित करताना केला. मोदींच्या या विधानाला तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं. एक्स्पायरी बाबू, तुमच्यासोबत 1 नगरसेवकदेखील जाणार नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधानांवर पलटवार केला. त्यांनी मोदींवर घोडेबाजाराचादेखील आरोप केला.
 
पंतप्रधान मोदींनी सेरामपूरमधील जनसभेत तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. निवडणुकीनंतर तृणमूलचे अनेक आमदार पक्ष सोडणार असल्याचं मोदी जाहीर सभेत म्हणाले. मोदींच्या या विधानाला ओब्रायन यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं. 'कोणीही तुमच्या सोबत जाणार नाही. एक नगरसेवकदेखील जाणार नाही,' असं ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यात त्यांनी मोदींचा उल्लेख एक्स्पायरी बाबू असा केला. तुम्ही निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या विधानाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंदेखील ते म्हणाले. 




काल (सोमवारी) मोदींनी जनसभेला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. 'देशाची जनता चुकीला क्षमा करेल. मात्र विश्वासघाताला कधीही माफ करणार नाही. दीदी, तुमच्या पायाखालील जमीन सरकली आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल येईल आणि चारही दिशांना कमळ उमलेल. तेव्हा तुमचे आमदार तुम्हाला सोडून पळून जातील. आजही तुमचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत,' असं मोदींनी म्हटलं होतं. 

Web Title: lok sabha election 2019 Campaigning or horse trading tmc asks PM narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.