भाजपने बारामती जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:12 AM2019-04-24T05:12:35+5:302019-04-24T05:13:36+5:30

...अन्यथा त्यांनी निवृत्ती घ्यावी

If BJP wins Baramati, we will retire from politics: Ajit Pawar | भाजपने बारामती जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन- अजित पवार

भाजपने बारामती जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन- अजित पवार

Next

बारामती : येथील मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे याच विजय होतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. ही जागा भाजपने जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन. मात्र, भाजपला जिंकता न आल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

‘माझा दादा जे बोलला तेच होईल, माझा विजय निश्चित आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. युतीच्या उमेदवार कांंचन कुल यांनी निवडणूक जनतेने हातामध्ये घेतल्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावा केला. दरम्यान, मतदारसंघात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले. जिरायती भागाचा पाण्याचा प्रश्न यंदाच्या निवडणुकीत गाजला होता. या भागात सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे.

Web Title: If BJP wins Baramati, we will retire from politics: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.