आश्चर्य! चक्क त्यानं लग्नपत्रिकेतून मागितला डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मतांचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:01 PM2019-03-27T18:01:30+5:302019-03-27T18:26:11+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मतदान करण्याचे आवाहन लग्नपत्रिकेतून जिल्ह्यातीलच एका वराने केले आहे

He asked votes for Sujoy Vikhe in ahmednagar constitution election | आश्चर्य! चक्क त्यानं लग्नपत्रिकेतून मागितला डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मतांचा आहेर

आश्चर्य! चक्क त्यानं लग्नपत्रिकेतून मागितला डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मतांचा आहेर

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मतदान करण्याचे आवाहन लग्नपत्रिकेतून जिल्ह्यातीलच एका वराने केले आहे. पारनेर तालुक्यातील फिरोज अल्लाउद्दीन शेख या मुस्लिम वराने डॉ. सुजय विखे यांना मतदान करण्याचे आवाहन लग्नपत्रिकेतून केले आहे.

पारनेर तालुक्यातील निघोज येथील फिरोज अल्लाउद्दीन शेख हे राहाता तालुक्यातील हसनापूर येथील मोसिना पठाण यांच्याशी १ एप्रिल २०१९ रोजी विवाहबद्ध होत आहेत. हा विवाहसोहळा राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे पार पडणार आहे. इस्लाम रितीरिवाजाप्रमाणे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. वर फिरोज शेख यांनी जवळपास ५०० लग्नपत्रिका छापल्या आहेत.

फिरोज हे पत्रिका वाटप करताना सुजय विखे यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. फिरोज यांनी फिजिक्स विषयात पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ''किसी भी तरह का तोहफा मत दिजीये. मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ.सुजयदादा विखे पाटीलजी को वोट जरूर किजीयें.'' असे आवाहन फिरोज शेख यांनी केले आहे.

Web Title: He asked votes for Sujoy Vikhe in ahmednagar constitution election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.