पदवीला अडखळली निम्म्या उमेदवारांची गाडी, कोणत्या मेरिटवर होते मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:47 AM2019-04-15T01:47:13+5:302019-04-15T01:47:25+5:30

लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये निम्म्या उमेदवारांची गाडी पदवीलाच अडखळलेली दिसून आली आहे. तर, उर्वरीतांपैकी दोघे जण अशिक्षित आहेत.

Half of the candidates stumbled in the train, which car was on the merit? | पदवीला अडखळली निम्म्या उमेदवारांची गाडी, कोणत्या मेरिटवर होते मतदान?

पदवीला अडखळली निम्म्या उमेदवारांची गाडी, कोणत्या मेरिटवर होते मतदान?

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये निम्म्या उमेदवारांची गाडी पदवीलाच अडखळलेली दिसून आली आहे. तर, उर्वरीतांपैकी दोघे जण अशिक्षित आहेत.
मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, पश्चिम, मानखुर्द शिवाजी नगर हे विधानसभा क्षेत्रात उच्चभ्रू लोकवस्तीबरोबरच सर्वसामान्य मतदार अधिक
आहेत. यात, घाटकोपरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो. अशात संमिश्र लोकवस्ती असलेल्या या मतदार संघात, एकूण २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यात, युतीचा उमेदवार दहावी तर, आघाडीचा उमेदवार पदवीधर आहे.
अपक्षांमध्येही उच्चशिक्षित तसेच तरुण पिढीचा पुढाकार कमी दिसून आला. यामध्ये ७ जण पदव्युत्तर, ५ जण पदवीधर आहेत. मतदारांचा शिक्षणाबरोबरच अनुभवी तसेच काम करणा-या उमेदवाराकडे कल अधिक असल्याचेही दिसून येते. त्याने, जास्तीत जास्त मतदारांच्या प्रश्नांना केंद्रापर्यंत नेत, त्या मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.
>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?
शिक्षित उमेदवारच हवा
निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्यांमध्ये शिक्षित उमेदवार असेल, तो आमचे प्रश्न मार्गी लावू शकतो. आमच्या तरुण पिढीचे जो नेतृत्व करू शकेल आणि आमच्या शैक्षणिक, तसेच विकासाच्या मुद्द्याला केंद्रापर्यंत पोहोचवू शकेल.
- अश्विनी भोर, नोकरी, घाटकोपर.
अनुभवही महत्त्वाचा..
उमेदवार हा शिक्षितच हवा. त्यापेक्षाही तो अनुभवी आणि काम करणारा पाहिजे. शिक्षित असेल, तर आमचे प्रश्न समजून घेत ते मांडू शकतो. अन्यथा त्यालाच समजले नाही, तर तो केंद्रात काय भूमिका बजावणार.
- लता पाटील, गृहिणी, मुलुंड.
शिक्षण हवेच...
सद्यस्थितीत कोणीही उठून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहते. त्यांनाही किमान पदवीधर असण्याची अट घालायला हवी. जेणेकरून तो काम करेल. शिक्षणाबरोबरच तो भ्रष्टाचारी नको. काम करणारा हवा.
- संहिता बनकर, विद्यार्थी, विक्रोळी.
>७ पदव्युत्तर तर
६ पदवीधर...
अपक्षांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा, ७ पदव्युत्तर, ६ पदवीधर उमेदवारांची लगबग जास्त असली, तरी समाधानकारक नाही. उच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. तो येथेही पाहावयास मिळाला.

७ महिला उमेदवार..
२७ उमेदवारांमध्ये ७ महिला उमेदवारही निवडणुकीसाठी सज्ज आहेत. यात गृहिणी, समाजसेविकांचा समावेश आहे.

Web Title: Half of the candidates stumbled in the train, which car was on the merit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई