ज्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांचाच प्रचार करण्याची काकडेंवर वेळ..!  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 09:22 PM2019-03-27T21:22:23+5:302019-03-27T21:23:22+5:30

गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच...

girish bapat meet to sanjay kakde in pune..! | ज्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांचाच प्रचार करण्याची काकडेंवर वेळ..!  

ज्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांचाच प्रचार करण्याची काकडेंवर वेळ..!  

Next

पुणे: काही महिन्यांपासून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्वत:ला चर्चेत ठेवण्याची काळजी घेत होते. त्याचवेळी बंडखोरी किंवा पक्षांतराची अस्त्रेही त्यांनी उपसली होती. तिकीट द्या असे जरी ते कधी प्रत्यक्ष म्हटले नसले तरी ती महत्वकांक्षा लपवून राहायचे देखील काही कारण नव्हते. कारण अडीच लाख मताधिक्क्यांने पुण्यातून निवडून येईल, गिरीश बापटांच्या कसबा पेठेत ५०, ००० मतांची आघाडी मला मिळेल, अशा वक्तव्यांची सरबत्ती होय. पण आता याच काकडेंना ज्यांच्या विरोधात दंड थोपाटले होते त्या गिरीश बापटांचाच प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
भारतीय जनता पार्टीने गिरीश बापट याना पुण्याचे भाजपाचे लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर भाजपाची प्रकाश जावडेकरांच्या उपस्थितीत बापटांच्या प्रचारार्थ कोथरुड येथे सभाही झाली. बुधवारी सकाळी त्यांनी संजय काकडे यांची भेट घेतली. या भेटीत काय घडले यापेक्षा त्यानंतर चर्चा रंगली ती ज्यांच्या विरोधात दंड थोपाटले त्यांचाच प्रचार काकडे आता करणार.. अतिघाई संकटात नेई हा सुविचार त्यांच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीला तंतोतत लागू पडतेय.
    काँग्रेसची पुण्याच्या जागेविषयी असलेले संभ्रमावस्था व बापट यांच्या नावाने दिलेला उमेदवार यातून भाजपा पक्षनेतृत्वाचा ही जागा पक्की करण्याचा उद्देश असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे. लोकसभेचे बिगुल वाजण्यास सुरुवात पण झाली नव्हती तेव्हापासून काकडेंनी पुण्याचा लोकसभेचा उमेदवार म्हणून स्वत:च्या नावाचा सर्वत्र जयजयकार करण्यास प्रारंभ केला होता. यातूनच काकडेंकड़ून भाजपासह गिरीश बापटांना लक्ष्य केले होते. या एकसे बढकर एक खळबळजनक वक्तव्याने पक्षाला तिकीटासाठी इशाराच दिला होता. इतके करुन देखील आपल्याला कुणी विचारत नाही म्हटल्यावर काकडेनी मग मुख्यमंत्री मला भावासारखे आहेत. पण त्यांनीच मला लाथाडले असे म्हणत राष्ट्रवादीचे अजित पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या दरवाजाची कडीही वाजवली. पण त्यानंतर कुठे माशी शिंकली माहीत नाही.. पण दोन्ही घरातून काकडेंच्या पदरी नन्नाचा पाढा आल्याने त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली....मुख्यमंत्र्यानी मध्यस्थीचा हात फिरवत छोट्या भावाची समजूत काढत श्र्ध्दा सबुरीचा सल्ला देत निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले. 

काकडेंनी मला लोकसभेची मला उमेदवारी द्या असे कधीही म्हटले नाही पण त्यांनी मी निवडणुकीतला उमेदवार नाही असेही त्यांच्या लक्षणीय वक्तव्य, भेटीगाठी, यांतून कधी जाणवले नाही.गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच..पण तिकीट मिळवण्यात पदरी अपयश आल्याने त्यांच्या (दु)भंगलेल्या स्वप्नांची फक्त चर्चा तर होणारच ना.. 

Web Title: girish bapat meet to sanjay kakde in pune..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.