काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:57 AM2019-04-18T04:57:08+5:302019-04-18T04:57:27+5:30

जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे.

The existence of the Congress, the battle of BJP's prestige | काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

Next

- संजय देशमुख
जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत असून, यावेळीही विजयासाठी ते अथक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पक्षबांधणी आणि केलेली विकास कामे या मुद्दयावर ते मत मागत आहेत.
काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे. मध्यंतरी मित्रपक्षाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना निवडणुकीत आव्हान देण्याची गर्जना केली होती. त्यामुळे त्यांचे मन वळवितांना दानवेंची मोठी दमछाक झाली. यामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच श्रीकृष्णाची भूमिका निभवावी लागली होती. मोठ्या प्रयत्नांती खोतकर यांचे बंड शमविण्यात यश आले.
हे जरी खरे असले तरी दानवे आणि खोतकरांच्या वादात शिवसैनिक भरडला गेला. नेमके कोणाचे ऐकावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. आता हा मुद्दा निकाली निघाल्यावर खोतकर आणि दानवे गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र, शिवसैनिक कुठली भूमिका घेतात ही देखील महत्वाची बाब ठरू शकते.


भाजपकडे कुशल संघटन कौशल्य असल्याने त्या जोरावर दानवे यांची स्थिती मजबूत असल्याचे बोलले जात आहे. परंतू, केंद्र आणि राज्यातील सरकारने शेतकरी विरोधी घेतलेली भूमिका तसेच राफेलचा मुद्दा आणि शहीद सैनिकांच्या नावावर मते मागण्यासाठीचा आटापिटा या बाबी न पटणाऱ्या आहेत.
त्यातच दानवे यांनी केलेले शेतकरी विरोधी वक्तव्यही नागरिक विसरलेले नाही तर दुसरीकडे काँग्रेसने स्वच्छ प्रतिमा असलेल्या सेवादलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी दिसत नाही. प्रत्येकजण औताडे यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. विकासकामे करताना दानवे यांनी त्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक हित कसे जपले हा मुद्दा औताडेकडून प्रचारात उचलला जात आहे. वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे किती मते खेचतात याकडे लक्ष लागून आहे.

>गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने विविध विकास कामांना कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला. ड्रायपोर्ट, आयसीटी, जिल्ह्यातील रस्ते आदंीचा यात समावेश आहे. या निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्दयावरून मत मागणार असून, जनता निश्चित साथ देईल
- रावसाहेब दानवे, भाजप
>विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षामध्ये केवळ धुळफेक करण्यात आली आहे. २० वर्षापासून भाजपचेच खासदार असताना पाहिजे तसा विकास झालेला नाही. एकूणच प्रस्तापितांविरूद्ध यावेळी वातावरण असल्याने त्या वातावरणाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे.
- विलास औताडे, काँग्रेस
>कळीचे मुद्दे
काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा जिल्ह्यात असलेला कमी संपर्क महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.
भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले असले, तरी याचे पडसाद प्रत्यक्ष मतदानावर कसे पडतात हे २३ मे ला मतमोजणीनंतर कळणार आहे.

Web Title: The existence of the Congress, the battle of BJP's prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.