Election officials, including the ministers of the Alliance, will be removed in the High Court! | युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही हायकोर्टात खेचणार!
युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही हायकोर्टात खेचणार!

वसई : बविआचे शिट्टी हे चिन्ह तिला मिळू न देण्या जबाबदार असणा-या युती सरकारच्या मंत्र्यांना व त्यांना साथ देणा-या अधिकाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहोत अशी माहिती बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला रविवारी दिली.
पालघर निवडणूक अधिका-यांंनी रात्री उशीरा निवडणूक चिन्ह दिलं, मात्र यात केवळ चिन्हासाठी शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांनी घाणेरडं राजकारण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या सोबत गेल्या वीस वर्षापासून असलेल्या शिट्टीची फुरफुर्र थांबवलीत पण आता मिळालेल्या रिक्षाची भुर्रभुर्र कशी थांबवणार असा मिश्कील प्रश्न बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. आम्हाला शिट्टी ऐवजी आॅटो रिक्षा हे चिन्ह मिळालंय. सर्वसामान्यांची रिक्षा निशाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील रिक्षा चालक मात्र आनंदी आहेत. कारण आपली रिक्षा संसदेत जाणार, त्यामुळे अनेक नवे कार्यकर्ते आंम्हाला एका रात्रीत मिळाले. संपूर्ण जिल्हातील रिक्षा चालक व संघटनांचे सहकार्य व प्रचारात मदत मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. महायुती विरोधात महाआघाडीत थेट लढत होत असतांना भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्ताराम करवट यांनी यांनी बरीच मते आपल्याला मिळणार असल्याचा दावा केला आहे. सेना-भाजपा महायुतीची मते जर दत्ताराम करवट यांना मिळत असतील तर ती निर्णायक ठरू शकतील असे त्यांनी सांगीतले. फायदा व नुकसान कोणीही उभे राहिल्याने होत नाही असा टोला त्यांनी हाणला. पालघर जिल्हात होऊ घातलेले पाच ते सहा प्रकल्प ज्याचा सर्वसामान्यांना काडीमात्र फायदा नाही त्याबाबत महानगरपालिकेत सर्वानुमते ठराव करून याअगोदरच विरोध दर्शवला आहे. त्यात बडोदा-मुंबई एक्सप्रेस हायवे, वाढवण बंदर, बूलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई कॅरिडॉर, वसई-उरण रस्ता या प्रोजेक्टना आमचा विरोध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगीतले. पालघर जिल्हात बविआ हा पक्ष जुना आहे. त्याचे वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात तीन आमदार आहेत. त्यामूळे या पालघर लोकसभा निवडणूकीत बालेकिल्ला असलेल्या या तीन विधानसभा क्षेत्रात होणाºया मतदानाच्या ७० टक्के मतदान हे बहुजन विकास आघाडीच्या बाजूने होणार असल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हात कुपोषणाचा प्रश्नही गंभीर आहे. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याअगोदर त्या मधल्या मध्ये लाटणारे अधिकारी व मंत्री कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला.
>रिक्षा निशाणी बविआला फायद्याची ठरणार असल्याचा दावा
शिट्टी हे चिन्ह न मिळण्यासाठी भाजप-शिवसेनेने सत्तेचा पूर्ण गैरफायदा उचलून निवडणूक अधिकाºयांवर दबाव टाकला. त्यामूळे बविआला रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले.पण हीच रिक्षा चिन्ह बविआचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचिवणार आहेत. जिल्ह्यातील चालकांनी जाहिर पाठींबा बविआला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणूक प्रचार संपल्यावरही रस्त्यावर अप्रत्यक्षिरत्या बविआचे प्रातिनिधीत्व करणाºया रिक्षा प्रवाशांना घेऊन फिरणार असल्यामुळे आता निवडणूक आयोग आचारसंहितेचा भंग झाला म्हणून ओरड करणार का असे कार्यकर्ते मिस्कीलपणे बोलताना दिसत आहेत. बविआचा हा आशवाद प्रत्यक्षात कितपत खरा ठरेल, हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
>शब्दाला महत्व असलेली साहेबांची शिवसेना राहिली नाही
रात्री साडे बारापर्यंत चिन्हाचं वाटप होऊ दिलं नाही. केवळ मंत्र्याच्या दबावावर काम करणाºयां निवडणूक यंत्रणेसह मंत्र्याना सुप्रीम कोर्टात खेचणार आहे, असा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी दिला. आता साहेबांची शिवसेना राहिली नाही, साहेबांच्या शिवसेनेचा एक दरारा होता, शब्दाला महत्व होतं, पण आता तसे राहिले नाही. केवळ दाढी वाढवून धर्मवीर होता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
>कार्यकर्ते हीच बविआची ताकद
कार्यकर्ते हिच बहुजन विकास आघाडीची ताकद आहे.निवडणूक चिन्ह कोणते मिळणार याची चिंता नसली तरी, कुटनीतीच्या राजकारणामुळे बविआचा प्रत्येक कार्यकर्ता आता डिवचला गेला आहे. रिक्षा निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर स्वत: सोमवारपासून दोन दिवस कासार, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथे प्रचारासाठी जाणार आहेत.


Web Title: Election officials, including the ministers of the Alliance, will be removed in the High Court!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.