जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:08 AM2019-03-08T06:08:11+5:302019-03-08T06:08:30+5:30

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले.

 The challenge to keep the Congress ahead of the Congress and the BJP to win the seats | जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

Next

- राजेश भिसे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले. उमेदवार निवडीसह इतर चुका सुधारून याच मतदारांच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा जिंकण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांनी या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. विधानसभांमध्ये मिळालेल्या यशापेक्षा मोठे यश काँग्रेसला मिळवून देणे, हे त्यांच्यापुढे आव्हान आहे. दुसरीकडे गेल्या वेळी विजय मिळवलेल्या लोकसभेच्या सर्व जागा या खेपेस टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनीच्या नेतृत्वाखाली भाजपाने कार्यकर्ते व बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांमार्फत तसे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भाजपाची संपूर्ण टीम कामाला लागली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील २५ पैकी २५ जागांवर यश मिळविलेल्या भाजपासाठी यंदा लोकसभेच्या किमान १२ जागा धोक्यात असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष सचिन पायलट व प्रभारी रवींद्र दळवी यांनी गेल्या महिन्यापासून कार्यकर्ता प्रशिक्षण आणि आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
या निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला नसला तरी त्या कोणत्याही क्षणी जाहीर होतील, हे नक्की. तत्पूर्वी काँग्रेसतर्फे राज्यस्तरावर विधानसभानिहाय २५० कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर, बुथनिहाय नियोजन आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना बुथनिहाय नियोजन, पक्षाचे ध्येय धोरण व निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत माहिती दिली जात आहे. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांना ध्येय धोरणे व निवडणूक धोरणाबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर राहणार आहे. गट, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. राज्य सरकारने बेरोजगार भत्ता, सवर्ण आरक्षण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील कामांमुळे पक्षाचा जनाधार वाढेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.
>उमेदवार निवडताना कस लागणार
यंदा बिकानेर, श्रीगंगानगर-हनुमानगड आणि चुरू या मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष असून, मागील तीन ते चार निवडणुकांपासून या जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. त्या आपणास मिळाव्यात, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहे. या मतदारसंघांसह इतरही भागांत आरक्षणानुसार जातीनिहाय सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे.

Web Title:  The challenge to keep the Congress ahead of the Congress and the BJP to win the seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.