भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 09:47 PM2019-03-26T21:47:39+5:302019-03-26T21:58:22+5:30

भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा..

BJP person ! Baramati is ours .. Do not look : Supriya Sule | भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

Next
ठळक मुद्देगेल्या 50 वर्षात राज्याचे राजकारण आमच्या कुटुंबाभोवती

केडगाव-  भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा..बारामती आमची आहे.तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहु नका. असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला दिला आहे.   
      राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार सुळे यांचा यवत व केडगाव येथे पदयात्रा व सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, जिल्हा परिषदेच्या सभापती राणी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आनंद थोरात, वैशाली नागवडे, गणेश कदम, दौलत ठोंबरे, सुभाष यादव, रामदास दोरगे, विकास खळदकर, भाऊसाहेब दोरगे आदी उपस्थित होते. 
     सुळे म्हणाल्या,बारामती आमची आहे.तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहु नका. निवडणुकीत मतदारांनी नेहमी मेरीटवर मतदान करावे. नातीगोती नंतर पाहावीत.सुनेत्रा अजित पवार यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा विवाह आमदार राहुल कुल यांच्याशी घडवुन आणला.या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या नात्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे 4 उमेदवार खासदार होणार आहे.त्यामुळे दिल्लीमध्ये सुनेत्रा वहिनींचे वजन वाढणार आहे.
आदर्श संसदपटू पुरस्कार मी विरोधात असताना मिळाला. विरोध फक्त निवडणुकीपुरता असावा. पण सरकारने चुकीचे धोरण आखले की त्याला विरोध करणार. मतदार संघातील जनतेला कधी विसरायचे नाही ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. गेल्या 50 वर्षात राज्याचे राजकारण आमच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. वयोश्री व कुपोषणात बारामती लोकसभा मतदार संघाचे कौतुकास्पद काम झाले आहे.       

परीक्षेपुर्वी अभ्यास करायचा ही शिकवण आईकडून

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की समोर उमेदवार कोण आहे ?याची काळजी नाही. प्रत्येक परीक्षेला बसण्यापूर्वी अभ्यास कसा करायचा व तयारी कशी करायची याची शिकवण मला माझ्या आईनी दिली आहे. त्यामुळे माझी परीक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली आहे.

Web Title: BJP person ! Baramati is ours .. Do not look : Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.