Because of Modi, the country's name is internationally, rendered by Anant Geete | मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन
मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन

रोहा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन या वेळी खासदार अनंत गीते यांनी केले. रोहा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते आपल्या भाषणात म्हणाले की, खासदार अनंत गीते यांचे स्वच्छ चारित्र्य आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत एकसुद्धा आरोप झालेला नाही. रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी, लोकांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे, हा समीर शेडगे लोकांची कामे करतो, ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो, माझ्याकडे जे कोणी येतात, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, गीते माझ्या सर्व प्रश्नांची दखल घेतात, कुणाला आरोग्य मदत, तर कुणाला शिफारस, कुणाला रस्ता, तर कुणाला नोकरी, प्रश्न काहीही असोत, लोकांच्या कामांना गीते नेहमी प्राधान्य देतात. आजवर कधीही त्यांनी मला निराश केलेले नाही. तरी गावातल्या लोकांना विनंती करतो, आपले मत एका प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला द्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नावीद अंतुले, कामगार नेते सूर्यकांत महाडीक, शिवसेना नेते सुलतान मुकादम आदी भाजप-सेनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Web Title: Because of Modi, the country's name is internationally, rendered by Anant Geete
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.