युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:49 PM2019-02-19T16:49:40+5:302019-02-19T16:50:22+5:30

मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला दिला असताना पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे.

After the declaration of the alliance, the BJP's claim on Maval has also been announced | युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा

युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून शिवसेना नेते आणि नगसेवक टार्गेट

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला दिला असताना पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. 
मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपाच्या काही नगरसेवकांनी पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दावा केला. बारणेंना उमेदवारी दिली तर काम करणार नाही, अशीही भूमिका घेतली होती. त्यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपाच्या संकल्प मेळाव्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपालाच मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बारणे यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली होती. बारणे नकोच असा सूर भाजपातील काही ज्येष्ठ तसेच राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनी आळविला होता. 
दुसरीकडे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्यावर मारहाणीचा दखलपात्र गुन्हाही दाखल झाला होता. भाजपाच्या नेत्यांच्या दबावाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. युतीची घोषणा केली असली तरी पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या नेत्यांत अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा होता. त्यावेळी  पुण्यात शिवाजी नगर येथे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांचा समावेश होता. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शर्मिला बाबर यांनी भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपा मिळावा, शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.  
भाजपाकडून शिवसेना टार्गेट
पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून शिवसेना नेते आणि नगसेवकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला असून युतीचा तिढा सुटला असला तरी भाजपा आणि शिवसेनेतील नेत्यांचे मनोमिलन कधी होणार? होणार की नाही? हा खरा प्रश्न आहे

Web Title: After the declaration of the alliance, the BJP's claim on Maval has also been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.