अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:28 PM2019-04-07T16:28:28+5:302019-04-07T16:30:59+5:30

पहिल्या टप्प्यातील मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना काँग्रेसकडून टॅगलाईनची घोषणा

Ab Hoga Nyay Congress Election Tagline Banks on Minimum Income Scheme | अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन

अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन

Next

नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची अब की बार मोदी सरकार ही घोषणा चांगलीच गाजली होती. यानंतर आता काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय योजनेला केंद्रस्थानी ठेवत 'अब होगा न्याय' घोषणा दिली आहे. गेले काही आठवडे काँग्रेसकडून घोषणेवर काम सुरू होतं. अखेर आज याबद्दलची माहिती काँग्रेसनं दिली.





लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला फक्त चार दिवस शिल्लक आहेत. त्याआधी काँग्रेसनं 'अब होगा न्याय' घोषणा दिली आहे. किमान उत्पन्न योजनाच काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, हे या घोषणेतून काँग्रेसनं अधोरेखित केलं आहे. 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा केली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातही न्याय योजनेवरच भर देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना न्याय देण्यात येईल, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. 

न्याय योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत. काँग्रेसचं सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला होता. 'जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली होती. 

Web Title: Ab Hoga Nyay Congress Election Tagline Banks on Minimum Income Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.