भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:35 PM2019-03-26T13:35:48+5:302019-03-26T13:36:58+5:30

लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे.

aap founder arvind kejriwal slams bjp for dropping lalkrishn adwani and muralimanohar joshi | भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख

भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख

Next

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे. या निमित्तानं राजकीय पक्षही एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाही. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची नावं जाहीर करत आहेत. जस जशी उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत, तस तसे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू दिला आहे. अशाच नेत्यांनी भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं वगळण्यात आली आहेत. आता या मुद्द्यावरून भाजपावर विरोधकांनीही निशाणा साधला आहे.

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं उमेदवारांच्या यादीतून वगळल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही दुःख झालं आहे. अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपानं ज्येष्ठांचा अपमान केला आहे. ते हिंदू संस्कृतीच्या विरोधातही आहे.


हिंदू धर्मात आपल्याला ज्येष्ठांचा सन्मान करणं शिकवण्यात आलं आहे. आमचं सरकारनं दिल्लीत सुशासन स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार त्यामध्ये अडचणी आणत आहे. सीसीटीव्हीसाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु केंद्र सरकारनं तसं होऊ देत नाहीये. 

Web Title: aap founder arvind kejriwal slams bjp for dropping lalkrishn adwani and muralimanohar joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.