आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:00 AM2019-04-16T00:00:37+5:302019-04-16T00:01:06+5:30

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी दाखल झाल्या

131 complaints of violation of the Code of Conduct, and 75 sent notices to the people | आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या

आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या

Next

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी ५६ तक्र ारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. ७५ तक्र ारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. सर्वाधिक तक्र ारी चिंचवडमध्ये दाखल झाल्या असून, मावळमध्ये खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण अधिक आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करणे, माघारीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. मावळच्या रिंगणात २१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत.
>अ‍ॅपवर अधिक तक्र ारी : निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना आॅनलाइन तक्र ारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्र ारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच आॅफलाइन तक्र ारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
>बोगस तक्र ारींचे प्रमाण वाढले
पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन तक्र ारी खऱ्या असल्याचे आढळून आले आहे, तर कर्जतमध्ये एक तक्र ार खरी असल्याचे आढळून आले आहे. उरणमध्ये पंधरापैकी सहा तक्र ारी खोट्या असल्याचे आढळून आले, तर नऊ तक्र ारींत तथ्यता आढळून आली. मावळमध्ये ३७ पैकी सर्वच तक्र ारी खोट्या असल्याचे आढळून आले. चिंचवडमध्ये ७0 पैकी आठ तक्र ारी निकाली काढण्यात आल्या आणि ६२ तक्र ारींत सत्यता आढळून आली. पिंपरीत पाचपैकी पाचही तक्र ारीत सत्यता आढळून आली नाही. ५६ तक्र ारी निकाली काढल्या आहेत, ७५ तक्र ारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. राजकीय द्वेषातून तक्र ारी दाखल करण्याची आणि यंत्रणा कामाला लावण्याचेही प्रकार शहरात घडले आहेत. सर्वाधिक तक्र ारी चिंचवडमध्ये दाखल झाल्या असून मावळमध्ये दाखल झालेल्या सर्वच तक्र ारींत सत्यता नसल्याचे आढळून आले आहे. पिंपरीतीलही एकाही तक्र ारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. तसेच सजग नागरिकांनी अ‍ॅपद्वारे तक्र ारी देण्यावर भर दिल्याचे माहितीत आढळून आले आहे.

Web Title: 131 complaints of violation of the Code of Conduct, and 75 sent notices to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.