मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:51 AM2019-04-17T01:51:20+5:302019-04-17T01:52:54+5:30

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

10 undergraduates in the constituency, and 11 candidates are graduates | मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर

मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. प्रामुख्याने झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू व गर्भश्रीमंत विभागाचा समावेश होतोच, तर जुहू, वर्सोवा, लोखंडवाला या भागात बॉलीवूड व सेलिब्रेटी या मतदार संघाचे मतदार आहेत.
या मतदार संघात एकूण २१ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक कला शाखेचे बीए पदवी प्राप्त केलेले सर्वात जास्त ४ उमेदवार आहेत. बीए करून कायद्याची पदवी घेतलेले २ उमेदवार, बीकॉम करून कायद्याची पदवी घेतलेला १ उमेदवार, बीएससी करून कायद्याची पदवी घेतलेला १ उमेदवार असून, एका उमेदवाराने सीएची पदवी घेतली आहे. ८वी उत्तीर्ण १ उमेदवार, ९ वी उत्तीर्ण ४ उमेदवार, १० वी उत्तीर्ण १ उमेदवार, तर १ महिला उमेदवार अशिक्षित आहे. येथील परिसराचा विचार करता, मुळातच हा मतदार संघ किंचितसा पांढरपेशा असल्याने त्यांचे प्रतिबिंब उमेदवारांच्या शिक्षणातून उमटत असल्याचे चित्र आहे.


>सुशिक्षित असल्याने किंचितसा दिलासा
विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी १९७० साली माटुंग्याच्या डी.जी.रूपारेल कॉलेजमधून अर्थशास्त्रामधून बीएमधून पदवी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी १९८४ साली पाटना येथून बीएमधून पदवी घेतली. समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी यांचे शिक्षण १२वी असून, ते उत्तर प्रदेशच्या लखनऊ विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत, तर ३ उमेदवार हे अल्पसंख्यांक आहेत. एकंदर हे उमेदवार सुशिक्षित असल्याने येथे मतदारांना किंचित दिलासा आहे.

>मतदारसंघात कला आणि विधि शाखेचे उमेदवार सर्वाधिक
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचा विचार करता, येथे कला आणि विधि शाखेचे उमेदवार अधिक आहेत. त्या खालोखाल इतर अभ्यासक्रमांचे उमेदवार असून, सात उमेदवार हे इतर विभागातील असल्याचे निदर्शनास येते.
<मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. देशाची वाटचाल जागतिक महासत्तेकडे होत आहे. उमेदवार हा शिक्षित, अनुभवी, उत्तम वक्ता त्यांच्या भागाची जाण असलेला, समस्या सोडविणारा आणि देश पातळीवरील समस्या पोटतिडकीने मांडणारा हवा.
- सुजाता तावडे,
लाईफ स्टाईल ब्लॉगर
शिक्षणाला महत्त्व आहे. त्यामुळे उमेदवार किमान पदवीधर असावा. उमेदवार हा अनुभवी हवा. समाजकारण, राजकारण, मतदार संघातील समस्यांची चांगली जाण असली पाहिजे. तो उत्तम वक्ता असला पाहिजे. वाचन व्यासंगी हवे. मतदार संघाच्या समस्या प्रभावीपणे मांडता येतील.
- नंदिनी परब, गृहिणी

Web Title: 10 undergraduates in the constituency, and 11 candidates are graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.