हिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेले अट्टल गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:11 AM2018-11-15T00:11:02+5:302018-11-15T00:11:20+5:30

दरोड्याची तयारी : एक पिस्टल, जिवंत काडतूस, घातक शस्त्रे जप्त

Zarband, the non-violent criminal of the Hinjewadi robbery | हिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेले अट्टल गुन्हेगार जेरबंद

हिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेले अट्टल गुन्हेगार जेरबंद

Next

हिंजवडी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूस रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस तसेच घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

रोहित लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. पडवळनगर, थेरगाव), अक्षय राजेंद्र फुगे (वय २०, रा. शिवराजनगर, जगताप डेअरी), आशिष कैलास कांबळे (वय २०, रा. पडवळनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचे सहा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या सराईतांकडून एक पिस्टल, काडतूस, चार कोयते, मिरची पूड रोख रक्कम, दोन दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १३) रात्री पोलीस नाईक विवेक गायकवाड यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित तरुणांचे टोळके सूस रस्त्यावरील स्मशानभूमीच्या अलीकडच्या कोहिनूर सोसायटीसमोरील मोकळ्या मैदानात दुचाकींवर थांबले आहेत. माहिती मिळताच ताबडतोब वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी कोहिनूर सोसायटीकडे धाव घेतली. तेथे उभे असलेल्या संशयित तरुणांना हटकले असता पळून जाणाºया टोळक्यामधील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. इतर सहा जण पसार झाले आहेत.

ताब्यात घेतलेल्या रोहित गायकवाडवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. अक्षय फुगे व आशिष कांबळे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. फरार झालेल्या आरोपींची नावे समजली असून, ते देखील अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, उपनिरीक्षक अशोक गवारी, किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, विवेक गायकवाड, आतिक शेख, कुणाल शिंदे, विकी कदम, सुभाष गुरव, जनसिंग गुमलाडू,अमर राणे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
 

Web Title: Zarband, the non-violent criminal of the Hinjewadi robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.