ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:35 PM2018-01-23T13:35:18+5:302018-01-23T13:39:09+5:30

रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली.

wrestling competition in Pimpri Chinchwad; dharmaraj utsav occasion | ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा

ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा

Next
ठळक मुद्देतीन दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता झाली कुस्त्यांच्या आखाड्याने पंचक्रोशीसह जिल्हा व शहरातील शौकिनांनी केली होती मोठी गर्दी

किवळे : रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. आखाड्यात चमकदार कुस्त्या झाल्याने चांगलीच रंगत आली. तीन दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या आखाड्याने झाली. रावेत येथील महापालिका शाळेजवळ लाल माती टाकून खास बनविलेल्या मैदानात झालेला कुस्त्यांचा आखाडा पाहण्यास पंचक्रोशीसह जिल्हा व शहरातील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. आखाड्याच्या सर्व बाजूंनी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याने शौकिनांना कुस्त्या व्यवस्थित पाहता येत होत्या. 
कुस्त्यांच्या आखाड्याचे पूजन पोलीस पाटील दिवाणजी भोंडवे व माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांनी केले. माजी सरपंच बाळासाहेब भोंडवे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, उद्योजक राजेंद्र भोंडवे, पोपट भोंडवे, मधुकर भोंडवे आदी उपस्थित होते. 
शेवटची कुस्ती रहाटणी येथील किशोर नखाते व फुगेवाडी येथील अभिषेक फुगे यांच्यात होऊन ती बरोबरीत सोडविण्यात आली. पंच म्हणून योगेश शिंदे, सचिन भोंडवे, संभाजी भोंडवे, सुनील भोंडवे, बाळकृष्ण भोंडवे, साहेबराव भोंडवे यांनी काम पाहिले. नरेंद्र सोनटक्के, विजय भोंडवे, शांताराम भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. रावेत ग्रामस्थ मंडळींनी संयोजन केले.

Web Title: wrestling competition in Pimpri Chinchwad; dharmaraj utsav occasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.