वडगाव कातवीच्या नगरपंचायतीसाठी मुसळधार पावसातही मतदारांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:19 PM2018-07-15T16:19:27+5:302018-07-15T16:21:19+5:30

वडगाव कातवीच्या पहिल्या नगरपंचायतीचे मतदान अाज पार पडत असून मुसळधार पाऊस असताना मतदारांनी माेठी गर्दी मतदानासाठी केली अाहे.

voters comes to vote for vadgaon katvi election in heavy rain | वडगाव कातवीच्या नगरपंचायतीसाठी मुसळधार पावसातही मतदारांची गर्दी

वडगाव कातवीच्या नगरपंचायतीसाठी मुसळधार पावसातही मतदारांची गर्दी

Next

वडगाव मावळ : वडगाव कातवीच्या पहिल्या नगरपंचायतीचे अाज मतदान हाेत अाहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असताना मतदार नागरिक माेठ्याप्रमाणावर मतदान करण्यासाठी बाहेर पडले अाहेत. सर्वच मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र अाहे. सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीड पर्यंत 53.12 टक्के मतदान झाले. 

काही महिन्यापूर्वीच वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायत बदलून वडगाव कातवी नगरपंचायत करण्यात अाली. नगरपंचायत झाल्यानंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक हाेत अाहे. त्यामुळे या निवडणूकीत निवडणून येण्यासाठी सर्वच उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत अाहे. अाज वडगाव अाणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असताना नागरिक रेनकाेट, छत्र्या घेऊन मतदान करण्यासाठी बाहेर पडले अाहेत. सकाळपासूनच माेठी गर्दी नागरिकांनी मतदान केंद्रांवर केली अाहे. या मतदानासाठी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. 

Web Title: voters comes to vote for vadgaon katvi election in heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.