मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 05:00 PM2018-09-21T17:00:22+5:302018-09-21T17:09:24+5:30

मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.

Unmanned machine of Nirmalya Compilation experiment in Moshi | मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचा प्रयत्न ३५० किलो निर्माल्य एकावेळी संकलित करण्याची या मशिनची क्षमता पिंपरी-चिंचवडमहापालिका हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे संकलनही मशीन समुद्रात चार किलोमीटरपर्यंतचा कचरा आणि निर्माल्य संकलित करू शकते.

मोशी : निर्माल्य संकलनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आणि इतर यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, पुरेशा जनजागृतीअभावी या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाहीत. परिणामी निर्माल्याची समस्या कायम आहे. यावर मात करण्यासाठी मानवरहित मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. थेट नदीपात्रातून या मशिनच्या साह्याने निर्माल्य संकलन करणे शक्य झाले आहे.  
मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ३५० किलो निर्माल्य एकावेळी संकलित करण्याची या मशिनची क्षमता आहे. पिंपरी-चिंचवडमहापालिका हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे संकलन या मशिनच्या साह्याने करण्यात येत आहे. 
मशिन दोन मीटर लांब, १.७५ मीटर रुंद आणि ४५ सेंटीमीटर उंची असून ह्यवॉश शार्क मिशन सह एक आयताकृती बॉक्स आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक बास्केट आहे. ग्राउंड कंट्रोल स्टेशन नावाच्या सॉफ्टवेअरच्या साह्याने ही मशीन समुद्रात चार किलोमीटरपर्यंतचा कचरा आणि निर्माल्य संकलित करू शकते. मशिनच्या पृष्ठभागावर कोणत्याही स्वरूपात साडेतीनशे किलो फ्लोटिंग कचरा, निर्माल्य, प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करता येऊ शकतात. प्लॅस्टिक आणि इतर कचरा यासह हे मशिन पाणी आणि रासायनिक घटकांचेही विलगीकरण करते. पाण्यातील कीटक आणि वनस्पती या मशिनच्या साह्याने काढता येतात. मानवरहीत असलेली ही मशीन ड्रोनशी संवाद साधू शकते. या मशीनच्या माध्यमातून चिंचवड येथील गणेशमूर्ती विसर्जनावेळी सुमारे साडेतीनशे किलो निर्माल्य, कचरा संकलित करण्यात आला आहे. 
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या मानवरहित मशिनच्या माध्यमातून या नद्यांतील निर्माल्य आणि कचरा संकलनाचे काम सुरू आहे.
 

Web Title: Unmanned machine of Nirmalya Compilation experiment in Moshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.