unknown fire on women in pimpari | पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली
पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका महिलेवर गोळीबार केला. ही घटना एच ए कॉलनीतील शाळेजवळ घडली. नेम चुकला,गोळी बाजूने निघून गेली, सुदैवाने यातून  महिला बचावली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. शितल सिकंदर (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) या महिलेवर गाेळीबार करण्यात अाला. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शितल सिकंदर ही महिला  दुपारी पाऊनच्या सुमारास एच ए कॉलनीतील शाळेसमोरून जात होती, त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पिस्तूलातून गोळी झाडली. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेकडे विचारपूस केली. कोणावर संशय आहे का याबाबत विचारणा केली. 

पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत. महिलेवर गोळीबार करण्याचे कारण काय असावे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत, महिलेकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.


Web Title: unknown fire on women in pimpari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.