पिंपरीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 09:24 PM2017-11-05T21:24:21+5:302017-11-05T21:24:36+5:30

पिंपरी : दुचाकीवर ट्रीपल सीट जाणा-या तीन तरुणांना भरधाव वेगात जाणा-या मोटारीची धडक बसली.

Two people were killed and one injured in a motorcycle in Pimpri | पिंपरीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी

पिंपरीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी

Next

पिंपरी : दुचाकीवर ट्रीपल सीट जाणा-या तीन तरुणांना भरधाव वेगात जाणा-या मोटारीची धडक बसली. यामध्ये दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोशी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मारुती कडवे (वय २७ रा. जाधववाडी,चिखली) व गोविंद देवराव शेळके (वय २२ रा. जाधववाडी, चिखली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. संतोष अरुण डिडवळ (वय २३ रा. आदर्शनगर, मोशी) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी आदिनाथ लेंडगुळे (वय २२ रा. जाधववाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

योगेश, गोविंद व संतोष हे तिघे दुचाकीवरुन ट्रीपलसीट उलट दिशेने जात होते. या वेळी समोरून येणा-या अज्ञात मोटारीची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये योगेश आणि गोविंदचा जागीच मृत्यू झाला. संतोष डिडवळ हा गंभीर जखमी झाला. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेशिस्त वाहतुकीचा एकाच आठवड्यातील शहरातील हा दुसरा अपघात आहे.  कानात हेडफोन लावून दुचाकी चालविणा-या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची ताजी घटना असताना, भोसरीत उलट दिशेने दुचाकी चालविणा-या दोन तरुणांचा करुण अंत झाला. 

Web Title: Two people were killed and one injured in a motorcycle in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.