पालिका कर्मचाऱ्यांसाठी तेवीस लाखांचे मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:10 AM2018-07-20T00:10:24+5:302018-07-20T00:12:04+5:30

स्थायी समितीत विविध कामांच्या खर्चास मंजुरी

Twenty-five lakh mobile for municipal employees | पालिका कर्मचाऱ्यांसाठी तेवीस लाखांचे मोबाइल

पालिका कर्मचाऱ्यांसाठी तेवीस लाखांचे मोबाइल

Next

पिंपरी : स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका कर्मचा-यांसाठी मोबाइल खरेदीचा विषय मंजूर केला असून, २३ लाखांचे मोबाइल खरेदी करण्यात येणार आहेत.
ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व मनपाच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी ग्रुप मोबाइल सुविधेसाठी येणाºया सुमारे २३ लाख रुपयांच्या खर्चास, एशियन क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या श्रेया शंकर कंधारे यांना आर्थिक साहाय्य अदा करण्यासाठी दोन लाखांच्या खर्चास मान्यता दिली.
ड क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील कचराकुंड्या, कचºयाचे ढीग उचलणे व वाहतूक करण्यासाठी सुमारे ९९ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च, ब व क क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यकक्षेतील घरोघरचा कचरा गोळा करून वाहतूक करणेकामी येणारा सुमारे एक कोटी ४२ लाख ३६ हजार रुपयांचा खर्च, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील घरोघरचा कचरा गोळा करून वाहतूक करण्यासाठी येणाºया सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चास, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील घरोघरचा कचरागोळा करून वाहतूक करणेकामी येणाºया सुमारे एक कोटी ३७ लाख ७९ हजार रुपये, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील घरोघरचा कचरा गोळा करून वाहतूक करणेकामी येणाºया सुमारे एक कोटी ४९ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.
स्थापत्यविषयक कामांना प्राधान्य
मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र. २६ मधील नाल्याची स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी सुमारे एक कोटी ३९ लाख ८४ हजार रुपयांच्या खर्च, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील कचरा संकलित करणासाठी सुमारे ६७ लाख रुपयांच्या खर्च, ग प्रभागातील जलनि:सारण नलिकांची यांत्रिकी पद्धतीने वार्षिक साफसफाई करणे व चोक अप काढण्यासाठी सुमारे ९६ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.
जलनि:सारण विभागाकडील आकुर्डी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत दत्तवाडीत जलनिस्सारण नलिका सुधारणाविषयक कामे करण्यासाठी सुमारे ४३ लाख १९ हजार रुपयांचा खर्च, ई प्रभागातील जुन्या मलवाहिन्यामध्ये सुधारणाविषयक कामे करण्यासाठी सुमारे ५८ लाख ११ हजार रुपयांच्या खर्च, क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहे. त्याच्या खर्चास मान्यता दिली.

 

Web Title: Twenty-five lakh mobile for municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.