तुकोबारायांचे उलगडणार जीवनचरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:46 AM2018-07-23T00:46:48+5:302018-07-23T00:47:10+5:30

गोपाळपुरा येथे बांधलेल्या भिंतीवर साकारणार शिल्पसृष्टी

Tucohara's biography | तुकोबारायांचे उलगडणार जीवनचरित्र

तुकोबारायांचे उलगडणार जीवनचरित्र

Next

देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत गोपाळपुरा येथे नव्याने बांधलेल्या तीन मजली श्री संत तुकाराममहाराज भक्त निवासाच्या आवारातील पूरसंरक्षक भितींवर संत तुकाराममहाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंगांची शिल्पसृष्टी पालखी देहूत परतण्यापूर्वी उभारण्यात येणार आहे.
राज्यातील एक वैशिष्टपूर्ण भक्त निवास होणार आहे. तीर्थक्षेत्राबरोबरच देहू हे संत संस्कृतीचे व्यासपीठ व सांस्कृतिक पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडताना दिसत आहे. संत तुकाराममहाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेली निवडक १२ शिल्पे वडगाव धायरी येथील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी तयार केली आहेत.
या शिल्पांच्या शेजारीच त्या शिल्पातील प्रसंगाबाबतचा अभंग आणि त्याबाबतची माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये ग्रेनाईट मार्बल वर कोरण्यात आली आहे. यातील प्रत्येक चित्र हे ६ फूट उंच व १० फूट रूंद आहेत. ही शिल्पे एफ. आर. फायबर ग्लासमध्ये तयार केली आहेत. हे मटेरियलवर ऊन व पाऊस याचा कोणताही परिणाम होत नसल्याने या टिकाऊ साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या शिल्पांमध्ये श्री संत नामदेवमहाराज हे श्री संत तुकाराममहाराजांच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार दिल्याचा प्रसंग, जिजाबाई श्री संत तुकाराममहाराजांना श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर जेवन घेऊन जातात तो प्रसंग, कीर्तनात श्री संत तुकाराममहाराज व भजनात तल्लीन असलेले भक्तगण. पंढरपूरला निघालेल्या वारीचा प्रसंग, श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन प्रसंग, भामचंद्र डोंगरावर भजन करतानाचा प्रसंग, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री संत तुकाराम महाराजांना पाठविलेला नजराना प्रसंग, शेतात राखण करताना शेतात गुरे जातात तो प्रसंग, इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवलेल्या गाथा वर आल्या तो प्रसंग, भगवान विष्णूचे नरसिंह अवतार, रामावतार, श्रीकृष्णावतार आणि विठ्ठल आवतार यांचे एकत्रित शिल्प अशी १२ शिल्पे लावण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी संस्थानने कल्पना मांडली होती व त्यासाठी २५ प्रसंगांची निवडही केली होती. मात्र निधी अभावी महत्त्वाच्या अशा केवळ १२ प्रसंगांची निवड करून ते या शिल्पसृष्टीमध्ये लावण्यात येणार आहे. ही सर्व शिल्पे तयार झाली असून, ती पालखी देहूनगरीत परत येण्यापूर्वी बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून ती आलेल्या भाविकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत.

Web Title: Tucohara's biography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.